
Metro 4 Update: मेट्रोतून उतरून थेट रेल्वे स्थानक आणि बस स्टँडवर जाणे आता सहज सोप्पे होणार आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे सुरू आहेत. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांना ये जा करणे सहज सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पादचारी पुलांची उभारणी केली जाणार आहे. या मेट्रो मार्गिकेवरील पंत नगर, विक्रोळी, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकांच्या परिसरात पादचारी पुलाची उभारणी करण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे.
या पुलांमुळं या भागात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून उतरून बसथांबा, टॅक्सी स्टैंड, रेल्वे स्थानकावर पोहोचणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून मेट्रो 4 मार्गिकेचा पहिला टप्पा या वर्षीअखेर सुरू केला जाणार आहे. तर संपूर्ण मार्ग पुढील दीड ते दोन वर्षात सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
मेट्रो 4 ही मार्गिका वडाळा येथून सुरू होऊन एलबीएस रस्त्यावरुन ठाण्याला जाते. या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यातून मेट्रो स्थानकातून प्रवासी रस्त्यावर उतरल्यास वाहतुकीलाही अडथळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर पादचारी पुलांमुळे प्रवाशांना थेट बस, टॅक्सी थांब्यावर अथवा रेल्वे स्थानकावर, तसेच इच्छितस्थळी विनाअडथळा पोहोचता यावे यासाठी या सुविधांची उभारणी करण्यास एमएमआरडीएकडून सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमण्याची एमएमआरडीएने सुरू केली आहे.
या पादचारी पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदाराची नियुक्ती केल्यावर त्याला १५ महिन्यांत या पादचारी पुलांची उभारणी पूर्ण करावी लागेल. या पादचारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा असेल, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची सोय केली जाणार आहे. दरम्यान, या पुलांच्या भागात विविध प्राधिकरणांच्या सेवा वाहिन्या आहेत. कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित असून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. वीज वाहिनी, पाण्याची पाईप, ड्रेनेज, आदींचा समावेश आहे. पादचारी पुलाच्या उभारणीसाठी त्यांचे स्थलांतरण करावे लागणार आहे.
मेट्रो 4 मार्गिका कशी असेल? (वडाळा – कासारवडावली)
वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील. सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.