digital products downloads

मेट्रो, लोकल ते ठाण्यातील उन्नत मार्ग….; मुंबई, पुणे ते नागपूरकरांसाठी घेण्यात आले मोठे निर्णय

मेट्रो, लोकल ते ठाण्यातील उन्नत मार्ग….; मुंबई, पुणे ते नागपूरकरांसाठी घेण्यात आले मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decisions Today : आज राज्य मंत्रिमंडाळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली ज्यात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरकरांसाठी हे निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली असून त्यात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

मेट्रो, लोकल ते ठाण्यातील उन्नत मार्ग…पाहा मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण निर्णय 

सामाजिक न्याय विभाग 

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1 हजार रुपयांची वाढ
लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार

ऊर्जा विभाग

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित

कामगार विभाग 

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा

कामगार विभाग

कारखाने अधिनियम, 1948 मध्ये सुधारणा

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार

नगर विकास विभाग

मुंबईतील आणिक डेपो- वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- 11 प्रकल्पास मान्यता. 23 हजार 487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद

नगर विकास विभाग

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका – 2, मार्गिका – 4 तसेच  नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. 2) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-4 (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-2 या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसहाय्यित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता. 

नगर विकास विभाग

पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या 683 कोटी 11 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता.
 
नगर विकास विभाग 

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा- 3 (MUTP-3) व 3अ (MUTP-3A)  प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता 
बाह्य सहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास, तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने 50% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

नगर विकास विभाग

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प  (MUTP- 3B) या प्रकल्पातील राज्य शासनाच्या 50 टक्के आर्थिक सहभागास मान्यता 

नगर विकास विभाग

पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार

नगर विकास विभाग

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग 
हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP) अंतर्गत BOT (Build Operate – Transfer) तत्त्वावर राबविण्यात येणार

नगर विकास विभाग

“नविन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार 
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोधणी (रिठी) व मौजा लाडगांव (रिठी), तालुका हिंगणा जि. नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र 692.06 हे. आर. जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ “नविन नागपूर” अंतर्गत “International Business and Finance Centre (IBFC)” विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्वत मान्यता.

नगर विकास विभाग

नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाहय वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत 4 वाहतूक बेट (Truck & Bus Terminal) विकसित करणार. 

विधि व न्याय विभाग

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता
प्रकल्पासाठी 3 हजार 750 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता

FAQ

1. आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विषयांवर निर्णय घेण्यात आले?

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास, नगरविकास आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मेट्रो, लोकल रेल्वे, ठाणे-नवी मुंबई उन्नत मार्ग, आणि नागपूरमधील नवीन प्रकल्प यांचा समावेश आहे.२.

2. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित कोणता निर्णय घेण्यात आला?

संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली. आता लाभार्थ्यांना दरमहा 1,500 ऐवजी 2,500 रुपये मिळतील.

3. नगरविकास विभागात मेट्रो प्रकल्पांबाबत कोणते निर्णय घेण्यात आले? 

मुंबई: वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या 16 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका-11 ला मान्यता. या प्रकल्पासाठी 23,487 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद. हा प्रकल्प जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) च्या सहाय्याने राबवला जाईल.  

ठाणे: ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला मान्यता. हा 29 किमीचा प्रकल्प 12,200.10 कोटी रुपये खर्चाने 2029 पर्यंत पूर्ण होईल.  

पुणे: मेट्रो मार्गिका-2 (वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली), मार्गिका-4 (खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी), आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग उपमार्गिकेला मान्यता. याशिवाय, बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन मेट्रो स्थानकांना आणि स्वारगेट ते कात्रज मार्गावर 421 मीटर स्थलांतरासह कात्रज स्थानकाला मान्यता. यासाठी 683 कोटी 11 लाख रुपयांची तरतूद.  

नागपूर: मेट्रो रेल्वे टप्पा-2 साठी बाह्य सहाय्यित कर्जाला मान्यता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp