
ज्येष्ठ उद्योजक, मॉडर्न ऑप्टिशियनचे संचालक, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल गोविंद गानू (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५ ) निधन झाले तर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली,
.
महाराष्ट्र चित्पावन संघ आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे ते माजी पदाधिकारी होते. ब्राह्मण जागृती सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, वेदशास्त्रोतेजक सभा, हर घर सावरकर, श्री सद्गुरु ग्रुप, जनलक्ष्मी बँक, लोकमान्य टिळक प्रतिष्ठान, असीम फाउंडेशन, परशुराम ढोल ताशा पथक अशा अनेक संस्थांचे व विविध ब्राह्मण संस्थांचे ते आधारस्तंभ होते.
कोकणात दापोलीजवळ बुरोंडी येथे त्यांनी भगवान परशुरामाचा भव्य पुतळा स्थापन करून परशुरामाचा सत्य इतिहास जनतेसमोर यावा यासाठी अहर्निश प्रयत्न केले. अनेक संस्थांना त्यांनी परशुरामाच्या सुबक मूर्ती प्रेरणा म्हणून भेट दिल्या. सामाजिक कार्यात ते अखेरपर्यंत सक्रीय होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे पुतळा उभारण्यात त्यांचा देखील मोलाचा वाटा होता.
भद्रबाहु गांधी यांचे निधन
भद्रबाहु मगनलाल गांधी यांचे शनिवारी (दि.२३) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. पी.एम. शहा फाउंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी आणि सौ. श्रध्दा गांधी-दोशी यांचे ते वडील होते. वालचंदनगर इंडट्रीजमधून व्यवस्थापक म्हणून ते निवृत्त झाले होते. त्यांनी मरणोत्तर देहदान केले असून त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही विधी केले जाणार नाहीत. वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे देहदान करण्यात येणार आहे. वानवडी येथील लष्करी महाविद्यालय येथेच सोमवारी (दि.२५) सकाळी १० ते ११ या वेळेत देह अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.