digital products downloads

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक; धक्कादायक पुणे कनेक्शन समोर

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना अटक; धक्कादायक पुणे कनेक्शन समोर

Terrorists Arrested At Mumbai Airport: मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने ही कारवाई केली आहे. हे दोन्ही दहशतवादी मागील दोन वर्षांपासून फरार होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 2023 मध्ये महाराष्ट्रातील पुण्यामध्ये आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयसिस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य असलेल्या या दोघांना अटक केली आहे. 

कोण आहेत हे दोघे अटक करण्यात आलेले दहशतवादी?

अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ ​​डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नाव आहे. या दोघांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-2 टर्मिनसवर इमिग्रेशन ब्युरोने जकार्ता, इंडोनेशिया येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली आहे.

दोघांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस 

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. त्यांच्याविरुद्ध मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एनआयएने दोन्ही आरोपींबद्दल माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.

भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट

आधीच अटक केलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या आयसिस (ISIS) पुणे येथील आठ स्लीपर मॉड्यूल सदस्यांसह गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. त्यांनी हिंसाचार आणि दहशतीद्वारे देशात इस्लामिक राज्य स्थापित करण्याच्या आयसिसच्या अजेंडाला पुढे नेण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारून भारताची शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचला होता.

mumbai airport nia

या दहशतवाद्यांनी पुण्यात केलं काय?

अटक केलेल्या इतर आरोपींसह आधीच आरोपपत्र दाखल केलेले हे दोघे जण पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फैयाज शेख यांनी भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी तयार करत होते. 2022-2023 या कालावधीत, त्यांनी या परिसरात बॉम्ब बनवण्याच्या आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये दोघांनी सहभाग घेतला होता, तसेच त्यांनी बनवलेल्या आयईडीची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोट घडवून आणला होता.

अटक करण्यात आलेले 10 जण कोण?

भारतविरोधी आयसिसच्या हिंसक आणि नापाक दहशतवादी योजनांना हाणून पाडण्यासाठी त्याच्या कारवायांचा सक्रियपणे तपास करणाऱ्या एनआयएने यापूर्वी या प्रकरणातील सर्व 10 आरोपींवर युए (पी) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान यांच्याव्यतिरिक्त, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतरांची ओळख पटली आहे. मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकिफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी या प्रकरणामध्ये यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp