
वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं. आज पहाटे 4 वाजता निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचले आहेत. तसेच त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यासोबतच निलेश चव्हाणचा फरार झालेला तेव्हाचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. निलेश चव्हाण कसा पळाला त्याची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहे. एका खासगी ट्रॅव्हल्समधून निलेश चव्हाण पळाला आहे. त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
निलेश चव्हाणचा ‘तो’ व्हिडीओ
निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुण्यातून फरार झाला होता. वैष्णवी यांच्या आई आणि वडिलाला बंदूक दाखवून त्यांना धमकी दिली होती त्यानंतर तो फरार झाला होता. निलेश चव्हाण कसा पळाला त्याची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहे. एका खासगी ट्रॅव्हल्समधून निलेश चव्हाण पळालाय. त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
Nilesh Chavan CCTV Footage | निलेश चव्हाण खाजगी ट्रॅव्हल्समधुन फरार झाला; पाहा सीसीटीव्ही फुटेज#nileshchavan #vaishanavihagwane #cctvfootages #zee24taas pic.twitter.com/hRfnUVGTYi
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 31, 2025
असा होता निलेश चव्हाणचा फरार झालेल्याचा प्रवास
निलेश चव्हाण हा कोकण मार्गे मुंबई आणि तिथून तो दिल्लीला पळाला. पुढे दिल्लीतून तो तसाच गोरखपूर मार्गे नेपाळ बॉर्डर क्रॉस करून देशाबाहेर पळून जाणार होता. पण पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने त्याला नेपाळ बॉर्डर क्रॉस करायच्या आधीच सोनवली गावातून पकडला. हे ठिकाण युपीच्या गोरखपूर जिल्ह्यातून पुण्यात आणलं आहे. मुंबई कर्जत रायगड बाय रोड दिल्ली गोरखपूर, सोनवली (उत्तर प्रदेश) भैरवा (नेपाळ) काठमांडू, परत भैरवा परत सोनवली (उत्तर प्रदेश) अटक….!
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचलेत. गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या. मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली अन पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. गेली दहा दिवस तीन राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहचला होता, तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला अन तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि ऍन्टी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकण्यात आल्या अन पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.