
- Marathi News
- National
- 12 Tejas Mark 1A Will Be Available This Year, Manufactured By Nashik HAL, BrahMos equipped Tejas Will Be Available This Month
मुकेश कौशिक | नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाला या महिन्याच्या अखेरीस स्वदेशी लढाऊ विमान ‘तेजस मार्क १ ए’ मिळेल. उड्डाण चाचण्यांची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, हे विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नाशिक येथील उत्पादन सुविधेमधून हवाई दलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल होईल. ऑपरेशन सिंदूरच्या काही आठवड्यांनंतर ते हवाई दलाच्या ताफ्यात येत आहे.
मार्क १ए श्रेणीच्या ८३ तेजस विमानांचा हा सौदा ४८ हजार कोटी रुपयांत झाला होता. पहिल्या विमानाची डिलिव्हरी मार्च २०२४ मध्ये अपेक्षित होती. मात्र, या विमानात अमेरिकेच्या जीई कंपनीकडून मिळणाऱ्या एफ ४०४ आयएन २० इंजिनच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे सुमारे सव्वा वर्षांनी पुढे ढकलली. एचएएलच्या सूत्रांनुसार, या मार्चपासून नवीन इंजिन मिळण्यास सुरुवात झाली. या वर्षाच्या अखेरीस हवाई दलाला १२ तेजस मार्क १ए लढाऊ विमाने मिळतील.
या विमानांच्या पुरवठ्यात उशीर झाल्याबद्दल हवाई दल प्रमुख एपी सिंह यांनी एरो इंडिया दरम्यान नाराजी व्यक्त केली होती. एका व्हिडिओद्वारे ही नाराजी सार्वजनिकही झाली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर एका इंडस्ट्री प्रोग्राममध्ये हवाई दल प्रमुखांनी संरक्षण प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबावर पुन्हा एकदा आपले मत मांडले होते. कोणतीही संरक्षण परियोजना वेळेवर पूर्ण झाल्याचे त्यांना आठवत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत च्या मजबूत इराद्यांसह सरकारने एचएएलसोबत एकूण १८० तेजस मार्क १ ए चा सौदा केला आहे. पहिली खेप ८३ विमानांची आहे, तर दुसऱ्या खेपेअंतर्गत ६७ हजार कोटी रुपयांचा सौदा ९७ विमानांच्या पुरवठ्यासाठी झाला आहे.
स्वदेशी फायटरची वैशिष्ट्ये
तेजस मार्क १ए पाकिस्तान आणि चीनशी स्पर्धा करण्यात मोठी भूमिका बजावू शकते. ते १५०० किमीच्या अंतरावर ध्वनीच्या वेगापेक्षा १.८ पट वेगाने उड्डाण करू शकते… स्वदेशी रचना : हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने हे सिंगल-इंजिन मल्टी-रोल लढाऊ विमान डिझाइन केले.
कमी वजन: त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके सुपरसॉनिक लढाऊ विमान. रिकाम्या विमानाचे वजन सुमारे ६,५०० किलो आहे. बहुभूमिका क्षमता : हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा व टोही मोहिमांसाठी योग्य आहे. सुपरसॉनिक वेग : १.६ मॅक (सुमारे १,९७५ किमी/तास) पर्यंत कमाल वेग घेण्यास सक्षम. मारक क्षमता: ३,००० किमीची श्रेणी, जी लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी त्याची क्षमता दर्शवते. शस्त्र क्षमता: ५,३०० किलो पर्यंत शस्त्रे वाहून नेऊ शकते. या जेटमध्ये पुढील पिढीचे ब्रह्मोस एनजे क्षेपणास्त्र बसवले जाईल, जे पूर्वीपेक्षा हलके, वेगवान आणि घातक आहे. फ्लाय-बाय-वायर : डिजिटल फ्लाय-बाय-वायर सिस्टम. यामुळे उड्डाण नियंत्रणात अचूकता. एईएसए राडार: सक्रिय इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग अॅरे रडार लांब अंतरावरून अचूक लक्ष्य शाेधण्याची व मारा करण्याची क्षमता देते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.