
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपला जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारताला विश्वगुरु तथा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पाहत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची करुणावस्था दाखवणारे हे कटू वास्तव पुढे आले आहे हे विशेष. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात झरी- जामणी, बाभूळगाव, दिग्रस तालुक्यातील प्रत्येकी 3, घाटंजी, केळापूर, यवतमाळ तालुक्यातील प्रत्येकी 2, तर आर्णी, महागाव, दारव्हा, उमरखेड, नेर, कळंब व राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. पश्चिम विदर्भातील 45 टक्के क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. त्यानंतर 40 टक्के क्षेत्रावर सोयाबीन, तर उर्वरित क्षेत्रात डाळ व ज्वारीची लागवड केली जाते. पण यंदाच्या मुसळधार पावसामुळे शेती खरडून गेल्यामुळे उत्पन्नाची आशा मावळली होती. त्यामुळे हाती आलेल्या पिकांतून लागवड खर्चही निघणे अवघड झाल्यामुळे खचलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा व पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, असे तिवारी यांनी सांगितले आहे. कुणी – कुणी केली आत्महत्या? जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार, जानेवारी महिन्यात विलास जुनघरे (घाटंजी), प्रशांत गुडे (आर्णी), धीरज सामृतवार (केळापूर), सचिन मरस्कोल्हे (झरी), प्रकाश कुसराम (घाटंजी), नितीन देशमुख (महागाव), महादेव लावरे (दारव्हा), शरद देशमुख (उमरखेड), श्रीधर वरारकर (झरी), मारोती तुरणकर (झरी), गजानन हेमने (बाभुळगाव), गोपाळ घोंगे (बाभुळगाव), महेंद्र लडके (यवतमाळ), संदीप राठोड (दिग्रस), प्रकाश भुजाडे (दिग्रस), किसन वासनिक (बाभुळगाव), सुनील चव्हाण (यवतमाळ), नितीन फुलझले (नेर), वैभव शिरभाते (कळंब), महादेव ढगे (दिग्रस), प्रवीण वागदे (राळेगाव), शाहू राठोड (केळापूर) या 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या शेतकऱ्यांशिवाय भाड्याने शेती करणाऱ्या इतर 10 शेतकऱ्यांनीही आत्महत्या केल्या आहेत. मात्र, त्यांच्या नावावर सातबारा नसल्याने सरकारी दप्तरी त्यांची नोंद शेतकरी आत्महत्या म्हणून केली गेली नाही. परिणामी, या शेतकऱ्यांचे कुटुंबी सरकारी मदतीपासून वंचित आहेत. गतवर्षीही यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या किशोर तिवारी पुढे म्हणाले, गतवर्षी 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 446 शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 396, अकोल्या 388, बुलढाण्यात 343, वर्ध्यात 224 व वाशीम जिल्ह्यात 212 शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यात तरुण शेतकरी, भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सातबारा नाही म्हणून सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद नाही. मक्त्याने (भाड्याने) शेती करणाऱ्या शेतमजुरांची संख्याही प्रत्येक खेड्यात 50 टक्के आहे. त्यांना सरकारी पीककर्ज तसेच सरकारची नुकसानभरपाई मिळत नाही. नापिकी झाली तरी शेतीचे भाडे देणे अटळ असल्याने सातबारा नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने पतपुरवठा, बियाणे सुधार, पीक पद्धतीत बदल तसेच लागवड खर्च 50 टक्क्यांनी कमी करणे, हमीभावावर राज्याने बोनस देणे या उपाययोजना न केल्यास चालू वर्षात हे संकट अधिक गहिरे होण्याची भीतीही किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली. आत्महत्यांची प्रमुख कारणे काय?
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



