
Apple Stores Will Open In Pune : महाराष्ट्रातील दुसरे आणि भारतातील चौथे Apple स्टोर पुण्यात सुरु होणार आहे. IPhone 17 लाँचीग आधी आयफोन कंपनी भारतात दोन स्टोर सुरु करत आहे. त्यापैकी एक स्टोर पुण्यात आहे. या स्टोर मध्ये फक्त आयफोन विकले जाणार नाही तर ग्राहकांना ब्रँडिंग, प्रमोशन तसेच कोडिंगचे प्रशि७ण देखील दिले जाणार आहे,
2 सप्टेंबर 2025 रोजी बेंगळुरूच्या हेब्बल येथे आयफोनचे तिसरे स्टोर उघडणार आहे. तर, 4 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कोपा मॉलमध्ये आयफोनचे भारतातील चौथे स्टोर सुरु होणार आहे. पुण्यातील हे महाराष्ट्रातील दुसरे स्टोर आहे. या दुकानाचा लूक आणि डिझाइन बेंगळुरूमधील हेब्बल दुकानाच्या थीमवर आधारित असेल. भारताच्या संस्कृतीला लक्षात घेऊन ते डिझाइन केले आहे. दुकानाबाहेरील सजावटीत भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या आणि अभिमानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोराच्या पंखांनी प्रेरित सुंदर कलाकृती असणार आहे.
अॅपल 9 सप्टेंबर रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन आयफोन 17 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. या दिवशी अमेरिकेत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. हा लाँच कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. हा अॅपल कार्यक्रम कंपनीच्या वेबसाइटवर तसेच अॅपल टीव्ही अॅपवर लाईव्ह पाहता येईल.
अॅपलने अद्याप आयफोन 17 मालिकेत सादर होणाऱ्या मोबाईलचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार, कंपनी यावेळी 4 मॉडेल्स आणणार आहे, ज्यामध्ये आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे.
FAQ
1. महाराष्ट्रात अॅपल स्टोअर कधी आणि कोठे सुरू होणार आहे?
महाराष्ट्रातील दुसरा आणि भारतातील चौथा अॅपल स्टोअर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कोपा मॉलमध्ये 4 सप्टेंबर 2025 रोजी उघडला जाणार आहे.
2. भारतात अॅपलचे इतर स्टोअर कधी आणि कोठे उघडले जात आहेत?
2 सप्टेंबर 2025 रोजी बेंगळुरूच्या हेब्बल येथे अॅपलचा तिसरा स्टोअर उघडला जाईल, तर पुण्यातील स्टोअर हे चौथे स्टोअर असेल.
3. पुण्यातील अॅपल स्टोअरमध्ये काय सुविधा मिळतील?
या स्टोअरमध्ये फक्त आयफोन विकले जाणार नाहीत, तर ग्राहकांना ब्रँडिंग, प्रमोशन आणि कोडिंगचे प्रशिक्षण देखील उपलब्ध होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.