
Konkan Railway: दक्षिण कोकणमधील श्रद्धेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडी येथे दरवर्षी श्री भराडी देवीची भव्य जत्रा भरते. ही जत्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता कोकणातील लोकजीवनाचा अविभाज्य भाग मानली जाते. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक या पावन यात्रेसाठी आंगणेवाडी येथे दाखल होतात. यावर्षी 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या जत्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता असून अंदाजे 10 लाखांहून अधिक भक्त उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
विशेष ट्रेनची घोषणा
आंगणेवाडी जत्रेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, उपनगर आणि कोकणातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जत्रेसाठी खास सोयी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न भाविकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रवासाचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 01003 ही विशेष गाडी 8 फेब्रुवारी 2026 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी 7:55 वाजता सुटणार आहे. ही गाडी त्याच दिवशी रात्री 10:00 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. यामुळे जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना वेळेवर पोहोचणे सोपे होणार आहे.
परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक 01004 ही विशेष गाडी 7 फेब्रुवारी 2026 आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 5:50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दाखल होणार आहे.
स्टेशन थांबे आणि डबे
या विशेष ट्रेनला कोकण मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे अशा स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.
हे ही वाचा: कधी आहे आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव? कौल देत तिनंच ठरवली तारीख, पाहा तिचं महात्म्य…
प्रवाशांसाठी सुविधा
या ट्रेनमध्ये एकूण 22 डबे असणार असून त्यामध्ये 20 स्लीपर कोच आणि 2 एसएलआर कोच असतील. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या भाविकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. आंगणेवाडी जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष ट्रेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



