digital products downloads

रक्षाबंधनच्या दिवशीच बारामतीत विमानाचा अपघात; ‘घरावर, शाळेवर कोसळले असते तर?’ रेड बर्डवर कारवाईची मागणी!

रक्षाबंधनच्या दिवशीच बारामतीत विमानाचा अपघात; ‘घरावर, शाळेवर कोसळले असते तर?’ रेड बर्डवर कारवाईची मागणी!

Baramati Plan Accident: रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी बारामतीमध्ये अपघाताची घटना घडली. शनिवारी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी बारामती विमानतळावर रेड बर्ड एव्हिएशन या खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या शिकाऊ विमानाचा अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे असले तरी गेल्या 2 वर्षांतील रेड बर्डच्या तिसऱ्या अपघाताने स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेच्या प्रश्नावरून चिंता वाढली आहे.

…आणि मोठा अनर्थ टळला 

प्रशिक्षणार्थी पायलट विवेक यादव हा 24 वर्षाचा तरुण हे विमान उडवत होता. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या पुढील टायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. टायर वाकडे होऊन निखळल्याने विमान कोसळले. कटफळ गावाजवळ ही घटना घडली. जिथे पायलट विवेक यादवने प्रसंगावधान राखून विमान उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

याआधी 2 घटना 

रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानांचे यापूर्वी 19 आणि 22 ऑक्टोबर 2023 रोजी अपघात झाले होते. या दोन्ही घटनांनंतर तपास पथकाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संस्थेच्या नऊ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. वारंवारच्या अपघातांमुळे रेड बर्डच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरी उड्डाण मंत्रालयाने संस्थेचे कामकाज निलंबित केले आहे.

रेड बर्डवर कठोर कारवाईची मागणी 

या घटनेनंतर भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा शाखेने नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन सादर करून रेड बर्डवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही संताप वाढत आहे. बारामती औद्योगिक वसाहतीजवळ वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

घटना चिंताजनक

महाराष्ट्रातील विमान अपघातांच्या इतिहासात बारामतीतील ही घटना चिंताजनक ठरली आहे. यापूर्वी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे 1990 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला होता, ज्यात 55 जणांचा मृत्यू झाला होता. बारामतीतील सध्याच्या घटनेने रेड बर्डच्या प्रशिक्षण पद्धती आणि देखभाल यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिकांनी आणि राजकीय पक्षांनी आता डीजीसीए (DGCA) कडून कठोर तपासणी आणि कारवाईची मागणी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

अशा घटनांमुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे  भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रेड बर्डच्या हलगर्जी कारभारावर टीका केली. “विमान शहरी भाग, शाळा आणि औद्योगिक वसाहतींवरून उड्डाण करते, ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका आहे.” यापूर्वीही संस्थेविरुद्ध तक्रारी असूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ते म्हणाले. या अपघाताची सखोल चौकशी करुन रेड बर्डवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय. 

जबाबदारी कोण घेणार?

नागरी वसाहतीजवळील उड्डाणांवर बंदी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. यासंदर्भात आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडणार असे सोलणकर यांनी सांगितले. “उद्या एखादे विमान घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

FAQ 

१. बारामती विमानतळावर काय घडले?

शनिवारी, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७:४५ वाजता, रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाचा टायर बिघाडामुळे अपघात झाला. प्रशिक्षणार्थी पायलट विवेक यादव (वय २४, मुंबई) हे विमान उडवत होते. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.

२. हा रेड बर्डचा कितवा अपघात आहे?

हा गेल्या दोन वर्षांतील रेड बर्ड एव्हिएशनचा तिसरा अपघात आहे. यापूर्वी १९ आणि २२ ऑक्टोबर २०२३ रोजीही अपघात झाले होते.

३. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न का उद्भवला?

विमान शहरी भाग, शाळा आणि औद्योगिक वसाहतींवरून उड्डाण करते. जर विमान कोसळले तर मोठी जीवितहानी होऊ शकते, यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

४. रेड बर्ड एव्हिएशनविरुद्ध कोणत्या तक्रारी आहेत?

संस्थेच्या हलगर्जी कारभारामुळे यापूर्वी तक्रारी नोंदवल्या गेल्या, पण ठोस कारवाई झाली नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचे गांभीर्य नसल्याचा आरोप आहे.

५. भाजपा युवा मोर्चाच्या मागण्या काय आहेत?

१) अपघाताची सखोल चौकशी, २) रेड बर्डवर तात्काळ कारवाई, ३) नागरी वसाहतीजवळील उड्डाणांवर बंदी, ४) नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना.६. पुढील कारवाई काय होणार आहे?
वैभव सोलणकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांना भेटून हा मुद्दा मांडणार आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp