
रक्षाबंधनासाठी राख्या पाठवण्याचे हक्काचे माध्यम म्हणून या दिवसांत टपाल कार्यालयांमध्ये चांगलीच गर्दी उसळली आहे. येथील श्याम चौक स्थित मुख्य टपाल कार्यालयही त्याला अपवाद ठरले नाही. येथे आज, मंगळवारी दुपारी ग्राहकांची लांबच लांब रांग लागली होती. प्रत्य
.
पुढील महिन्याच्या नऊ तारखेला रक्षाबंधन आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेल्या या सणाला केवळ दहाच दिवस शिल्लक राहिल्याने त्यापूर्वी आपली राखी भावापर्यंत पोहचावी, अशी प्रत्येक बहिणीची अपेक्षा आहे. त्यामुळे बहुतेक टपाल कार्यालयांमध्ये सध्या गर्दी उसळली आहे. अचानक ओढवलेल्या या गर्दीमुळे नियमित कामकाजानिमित्त येणाऱ्या ग्राहकांनाही रांगेत उभे राहून आपला नंबर केव्हा येतो, याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रजिस्टर पोस्टाने पाठवावयाची टपाल, अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टींग (युपीसी), स्पीड पोस्ट, पत्रे, इतर पार्सल, मनी ऑर्डर, बचत खाते, विमा, पारपत्र, आधार अपडेशन आणि इतर वित्तीय सेवा टपाल कार्यालयामार्फत पुरवल्या जातात. त्यासाठीही ग्राहकांचा ओढा या कार्यालयाकडे असतो. परिणामी रोजच्या गर्दीत आणखी भर पडली आहे. यासंदर्भात पोस्ट मास्टरशी संपर्क केला असता दोन्ही ग्राहक एकत्रित झाल्यामुळे गर्दी वाढली, त्याचवेळी नवे सॉफ्टवेअर आणले असल्यानेही कामकाज थोडे संथ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांनी इतर डाकघरांकडे वळावे
शहरातील बहुतेक ग्राहकांचा मुख्य पोस्ट ऑफीसकडेच ओढा असतो. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर नेहमीच ताण असतो. शहरात टपाल खात्याची एकूण १७ कार्यालये आहेत. उपडाकघर म्हणून ओळखली जाणारी ही कार्यालये शहराच्या विविध भागांत आहेत. तेथेही पार्सल पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अंबापेठ, रुक्मीणीनगर, राजापेठ, बुधवारा, गाडगेनगर, हव्याप्र मंडळ आदी भागांतील या कार्यालयांचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुख्यालयी एक काउंटर वाढवले
ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता श्याम चौकातील मुख्यालयात एक अतिरिक्त काऊंटर सुरु करण्यात आले आहे. कार्यालयाच्या दर्शनी भागात आज, मंगळवारी दुपारपासून हे नवे काऊंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय एखाद्या ग्राहकाला मोठ्या प्रमाणात (बल्क) टपाल पाठवायचे असेल तर त्यासाठी मुख्यालयाच्या मागच्या बाजूस स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. – सुजीत लांडगे, पोस्ट मास्टर, मुख्य डाकघर, श्याम चौक, अमरावती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.