
- Marathi News
- National
- Whether The War Lasts 2 Months Or 5 Years, The Army Must Be Fully Prepared Rajnath Singh, Discussed Future Security Preparedness
महू2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
युद्ध छोटे असो वा दीर्घ… लष्कराने कायम संघर्षासाठी सज्ज असले पाहिजे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. बुधवारी मध्य प्रदेशातील महू येथे आयोजित ‘रणसंवाद’मध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘युद्ध २ महिने, ४ महिने, एक वर्ष, २ वर्षे किंवा ५ वर्षे चालले तरी आपण पूर्णपणे तयार असले पाहिजे. युद्ध जिंकण्यासाठी आता फक्त सैनिकांची संख्या किंवा शस्त्रास्त्रांचा साठा पुरेसा नाही. भविष्यातील युद्धे तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता, अर्थव्यवस्था आणि राजनैतिक कूटनीति यांचा एकत्रित खेळ असेल.’ सायबर युद्ध, एआय, ड्रोन आणि उपग्रह-आधारित पाळत ठेवणे भविष्यातील युद्धांना आकार देत आहेत. आधुनिक युद्धे आता बाह्य अवकाश आणि सायबर स्पेसमध्ये पसरली आहेत. २०२७ पर्यंत, सर्व लष्करी कर्मचाऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञान-आधारित प्रशिक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले.
युद्ध हा देशाच्या दृष्टिकोनाचा मुद्दा
राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा आता फक्त लष्करी बाब राहिलेली नाही. ती ‘संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनाचा’ मुद्दा आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्यांचे कौतुक करताना ते म्हणाले, की हे भारताचा स्वदेशी प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या यशाचे एक मोठे उदाहरण आहे. त्यांच्या कामगिरीने अधोरेखित केले आहे की येणाऱ्या काळात स्वयंपूर्ण होणे अत्यावश्यक आहे. आपण स्वयंपूर्णतेच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. परंतु अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
सागरी सुरक्षा आता अवकाश, सायबर आणि एआयवर देखील अवलंबून आहे – नौदल प्रमुख
रण संवादच्या समारोप सत्राला सीडीएस जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनीही संबोधित केले. सीडीएस म्हणाले की २०२६ मध्ये आग्य्राचा रण संवाद मल्टीडोमेन ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित असेेल. नौदल प्रमुख अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले की भारताची सागरी सुरक्षा पारंपारिक ताकद तसेच अवकाश, सायबर आणि एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानावर अवलंबून असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.