
शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय काय आनंदी आनंद आहे. जनतेच्या बोकांडी नतद्रष्ट सरकार बसले असून महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार पुन्हा होणार नाही.यांना कुणाची परवा नाही, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांनी सर
.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज दररोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जाच्या बोजा खाली शेतकरी दबला आहे. कर्जाच्या बोजा खाली शेतकरी दबला आहे. पीकविम्याचे नियम बदलले असून आता पूर्णपणे पीकविम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत आहेत. मत घेण्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचे तुम्ही बघा, अशी भूमिका सरकार घेत आहे.
कोकाटेंना नावापुरते मंत्रीपद
विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोकाटे यांना भाजपवाल्यांनी केवळ नावालाच मंत्री केले आहे. त्यांना कुठलाच अधिकार देण्यात आलेला नाही. अधिकार नसल्याने काही करण्याची यांची इच्छा नसेल. त्यामुळे त्यांना कोणतेही काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी याआधीच्या विधानांचा दाखला देत कृषि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचा निर्णय घ्यावा
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांना मारणारे, गुंड सोबत घेऊन फिरणारे आमदार, लुंगी बनेन वाले मंत्री काय सुरू आहे महाराष्ट्रात. हे सरकार शेतकऱ्यांचे वाली नाही. तुमचे तुम्ही बघा. बेईमान लोकं सरकारमध्ये बसली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन आहे अशा खोटारड्या धोकेबाज लोकांना धडा शिकवा आणि कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचे का नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधान केले आहेत अशी आठवण त्यांनी करुण दिली.
मंत्री सरनाईकांकडून कोकाटेंचे समर्थन
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात बसून मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा व्हिडीओ शेअर केल्यापासून विरोधकांनी कोकाटे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. तर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी माणिकराव कोकाटेंचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.