digital products downloads

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी – Chhatrapati Sambhajinagar News

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष:  नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी – Chhatrapati Sambhajinagar News

एक काळ असा होता जेव्हा आठवड्याची सुरुवातही नव्हती आणि आठवड्याचा शेवटही नव्हता. त्या काळात सुट्टी किंवा आपण ज्याला वीक ऑफ असे म्हणतो तो प्रकारच तेव्हा नव्हता. कामगारांना रोजच काम करावे लागायचे आणि तेही दिवस रात्र. इंग्रजांच्या काळात भारतीय कामगारांवर

.

मराठा साम्राज्य संपुष्टात आले आणि इंग्रजांनी भारतात आपले पाय पसरण्यास सुरू केले. संपूर्ण भारतावर इंग्रजांनी सत्ता स्थापन केली आणि आपल्याच देशातील लोकांना मोठ मोठ्या गिरण्यांमध्ये तसेच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी ठेवले. नोकरी म्हणण्यापेक्षा गुलामगिरीच शब्द योग्य आहे. 12-12 तास काम आणि त्यात विश्रांतीसाठी सुट्टीही नाही. भारतात मोजक्याच ठिकाणी मोठ्या गिरण्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई. मुंबईत अनेक गिरण्या सुरू करण्यात आल्या आणि त्यात आपल्या लोकांना गुलामासारखे वागवणे इंग्रजांनी सुरू केले. लोकही दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून गुरासारखे राबायचे.

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी - Chhatrapati Sambhajinagar News

मुंबईमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. तिथले दमट वातावरण व गर्मीमुळे कामगारांचा जीव अगदी कासावीस व्हायचा. विश्रांतीची तर सोय नाहीच. कोणी जर जरा वेळही बसलेले दिसले की इंग्रज अधिकारी यायचे हातात चाबूक घेऊन. परंतु या विरोधात कोणीही आवाज उठवण्यास पुढे येत नव्हते. हा सगळा त्रास नारायण लोखंडे यांना दिसत होता. कामगारांच्या भावना त्यांना कळत होत्या. नारायण लोखंडे हे मुंबईतील एका कापड गिरणीत स्टोअर कीपर म्हणून काम करत होते. कामगारांचा हा त्रास त्यांना पहावला नाही आणि अखेर त्यांनी कामगारांना हक्काची सुट्टी असावी, अशी मागणी करणारे अर्ज इंग्रज अधिकाऱ्यांना पाठवले. क्षणाचाही विलंब न करता इंग्रज अधिकाऱ्यांनी तो अर्ज फेकून दिला. परंतु नारायण लोखंडे हार मानणारे नव्हते. नारायण लोखंडे यांनी 1881 पासून एक चळवळ सुरू केली, जी 1889 पर्यंत म्हणजे जवळपास 8 वर्ष चालली.

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी - Chhatrapati Sambhajinagar News

कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या, कामाच्या ठिकाणच्या समस्या व अन्य अडचणींचा नारायण लोखंडे यांनी अभ्यास सुरू केला. दीनबंधू या त्यांच्या साप्ताहिकातून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. दीनबंधू हे पुण्यातील बंद पडलेले एक साप्ताहिक होते. याला नारायण लोखंडे यांनी पुन्हा नव्याने चालवायला घेतले. या साप्ताहिकातून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात तसेच सामाजिक विषयांवर जोरदार लेखन केले. यातून त्यांनी मोफत आणि सार्वत्रिक शेतकरी, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप देण्याचे तसेच 5 टक्के आरक्षण देण्याची देखील मागणी केली होती. याच वेळी इंग्रज कामगारांच्या आपत्यांविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात आठ वर्षांच्या आतील मुलांना गिरणीत कामावर ठेऊ नये, कामाच्या वेळेत विश्रांतीची सूट द्यावी आणि कामाची वेळ सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवावी, अशा शिफारसी करण्यात आल्या होत्या. या शिफारसींवर नेमण्यात आलेल्या आयोगाने गिरणी कामगारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घ्याव्यात असाही आग्रह लोखंडे यांनी केला होता.

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी - Chhatrapati Sambhajinagar News

कामगारांचे शोषण, कामाचे स्वरूप आणि मालकांची वृत्ती यावर नारायण लोखंडे उघड उघड टीका करत होते. या विचारांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी भारतातील पहिल्या बॉम्बे मिल हॅंड्स असोसिएशनची सुरुवात केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या समस्या आणि ठराविक वेळेसंदर्भातील मागण्या आक्रमकपणे मांडू लागले. 24 एप्रिल 1890 साली नारायण लोखंडे यांनी मुंबईमधल्या महालक्ष्मीच्या रेसकोर्स मैदानावर 10 हजार गिरणी कामगारांची सभा बोलावली होती. या सभेत दोन महिला कामगारांनी भाषण केले. ही आधुनिक भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक घटना ठरली आणि याच सभेच्या माध्यमातून कामगारांनी आपला आवाज दाखवून दिला. आपल्याला रविवारची सुट्टी देण्यात यावी अशी मागणी सर्व कामगारांनी एकमुखाने केली. कामगारांच्या या मागण्यांवर विचार करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी इंग्रजांनी सर जॉर्ज कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. सर जॉर्ज कॉटन यांनी 10 जून 1890 रोजी रविवारच्या सुट्टीस मंजूरी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. नारायण लोखंडे यांची सरकारने फॅक्टरी लेबर कमिशनवर नियुक्ती केली. 1891 चा विधेयक फॅक्टरी अॅक्ट निर्माण करण्यात लोखंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सर जॉर्ज कॉटन यांनी लोखंडे हे अतिशय बुद्धिमान आणि समर्थ कामगार पुढारी असा उल्लेख केला होता.

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी - Chhatrapati Sambhajinagar News

नारायण लोखंडे यांच्या संघर्षामुळे कामगारांना कोणते हक्क मिळाले?

– गिरणी कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळाली. – दुपारी कामगारांना अर्धा तास सुट्टी मिळाली. – गिरणी सकाळी 6.30 वाजता सुरू आणि सूर्यास्ताला बंद करण्यात येऊ लागली. – कामगारांचे पगार दर महिन्याच्या 15 तारखेला मिळायला लागले.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी काम केलेच, त्याचसोबत त्यांनी जात आणि सांप्रदायिक मुद्यांवरही काम केले आहे. 1895 मध्ये हिंदू मुस्लिम दंगलीत त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना ‘राव बहादूर’ ही पदवी देण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ हा सन्मान मोठ्या आदराने देऊ केला. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना – ‘बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन’ सुरू केली. यात त्यांना मदत मिळाली महात्मा ज्योतिबा फुले यांची. या संघटनेच्या माध्यमातून नारायण लोखंडे यांनी कामगारांचे मूलभूत प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य केले.

रविवारच्या सुट्टीसाठीचा संघर्ष: नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभारली चळवळ अन् कामगारांना मिळाली हक्काची सुट्टी - Chhatrapati Sambhajinagar News

नारायण लोखंडे यांच्याविषयी थोडक्यात

13 ऑगस्ट 1848 साली जन्मलेले नारायण मेघाजी लोखंडे हे पुणे जिल्ह्यातील कन्हेरसर गावचे. यांचे पालक व्यावसायिक संधींच्या शोधात नारायण लोखंडे यांच्या लहानपणीच ठाणे येथे स्थायिक झाले. वडील मेघाजी लोखंडे यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी नारायण यांना स्कॉटिश मिशनच्या शाळेत दाखल केले. याच शाळेत नारायण यांच्यावर समतावादी विचारांचे संस्कार झाले.

प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायण लोखंडे यांनी कल्याण येथे चीफ क्लर्क म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मुंबईला बदली झाल्यानंतर रेल्वेच्या सेवेत असताना तिथल्या कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीचे दर्शन झाले. कामगारांना करावी लागणारी मेहनत आणि कष्ट यासाठी कायद्याचे कुठलेही नव्हते. तसेच कामाच्या ठिकाणी असलेले अस्वच्छ वातावरण यामुळे कामगारांचे हाल होत होते. हे सर्व बघून नारायण लोखंडे अतिशय व्यथित झाले होते. यातून त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आणि एका मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून काम करायला सुरू केले. यातून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना हात घालण्यास सुरू केले.

कामगारांच्या समस्या जाणून घेताना व त्यावर विचार करताना नारायण लोखंडे यांची महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी भेट झाली. 1 डिसेंबर 1873 रोजी नारायण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले यांचे व्याख्यान आणि मुंबईत सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी नारायण लोखंडे अतिशय प्रभावित होते आणि त्यानुसार त्यांनी आपले आयुष्य सामाजिक सुधारणांसाठी वाहून घेण्याचे ठरवले आणि त्यानुसारच ते जगले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp