
राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची अखेर शिवसेना (शिंदे गट) पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली असून, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्य
.
धंगेकर यांना पुणे महानगर क्षेत्रातील पक्ष संघटन व विस्ताराची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा शिंदे गटाला पुण्यात मिळेल, असा पक्षाचा विश्वास आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत येत झाले शहराध्यक्ष
रवींद्र धंगेकर यांनी काही आठवड्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षप्रवेश करताना त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, “मी कोणत्याही पदासाठी आलेलो नाही, तर विकासाचे काम करण्यासाठी आलो आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशानंतरच त्यांच्या नावाची चर्चा विविध पदांसाठी सुरू झाली होती. आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्यांच्यावर पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुण्यातील राजकारणाला नवा रंग?
धंगेकर हे कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिकेतून आपली ओळख निर्माण केली होती. ड्रग्ज प्रकरण, गुन्हेगारी वाढ, आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी अनेकदा सरकारला धारेवर धरले होते. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना, शिंदे गटाने धंगेकरांवर विश्वास दाखवत शहराध्यक्षपद दिल्याने पक्ष संघटन वाढवण्याचा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो आहे. धंगेकर यांचा स्थानिक जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमधील पकड पाहता, शिंदे गटाची ताकद पुण्यात वाढण्याची शक्यता आहे.
धंगेकरांनी मानले आभार
माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.