digital products downloads

राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये, दुसराही लवकरच जाणार!: त्यांची निष्ठा ठाकरेंकडे नाही तर सोनिया गांधी अन् ‘सिल्व्हर ओक’च्या दारात- नवनाथ बन – Mumbai News

राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये, दुसराही लवकरच जाणार!:  त्यांची निष्ठा ठाकरेंकडे नाही तर सोनिया गांधी अन् ‘सिल्व्हर ओक’च्या दारात- नवनाथ बन – Mumbai News



देवाभाऊंनी कोणत्याही पक्षाची डेड बॉडी केलेली नाही, तो अधिकार जनतेला असतो. उबाठा गटाची डेड बॉडी करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेने तुम्हाला विधानसभेला 20 तर एकही मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तुमच्याकडे दिली नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करूच नका, जनतेने तुमच्या कानाखाली मारली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचे नाव ऑलरेडी काँग्रेसच्या ऑपरेशनमध्ये आले आहे. ते काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहेत, ते ठरलेले आहे. पुढच्या वेळी त्यांना खासदारकी मिळणार नाही, ती मिळावी यासाठी ते राहुल गांधी यांच्या संपर्कात असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. तुमची निष्ठा ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी नाही तर सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि उरली सुरली सिल्वर ओकच्या दारात ठेवलेली आहे. तुम्ही निष्ठेच्या गप्पा मारू नका, तुमचा एक पाय काँग्रेसमध्ये आहे, दुसरा कोणत्याही क्षणी जाईल. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमचा पक्ष अस्तित्वाला उरलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने ही तुमची अवस्था केली आहे. ऑपरेशन लोटस, टायगर सांगण्यापेक्षा पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष द्या. ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे 40 आमदार निघून गेले. त्या सरकारचे सर्वेसर्वा संजय राऊत हे होते. तरीही 40 आमदार गेले तुम्हाला कळले नाही,आता काय कळेल. राऊतांनी बालीश वक्तव्ये करू नये, स्वत:च्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी आहेत याकडे लक्ष द्या. नवनाथ बन म्हणाले की, संजूबाबा राऊत हे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या मु्द्द्यावर भाजपवर टीका करत आहेत. त्यांना आठवण करुण देतो गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे उमेदवार असताना त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होतो. अन् निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. ही प्रथा मोडण्याचे काम राहुल गांधी यांच्या काँग्रेसने केले आहे,हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही असे काही सुरू केले या भानगडीत राऊतांनी पडू नये. जेव्हा आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता. पण काँग्रेसने तसे सौजन्य बीड लोकसभेच्या वेळी दाखवले नाही. काल पण 4 वेळा विनंती केल्यावर काँग्रेसने उमेदवारी अर्ज पराभवाच्या भीतीने मागे घेतला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp