
उबाठाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी सकाळी सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपबद्दल खोटे बोलणं आणि आरोप करणे हा त्यांचा धंदा झाला आहे, राऊत हे उबाठाचे प्रवक्ते होते की पवार कुटुंबियांचे प्रवक्ते होते की का काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा प्रश्न पडावा अशी पत्रकार परिषद त्यांनी घेतली, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नको तिथे नाक खूपसणे आणि नको त्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा धंदा झाला आहे. त्यांनी कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते त्यांनी ठरवून घेतले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे पवार कुटुंबियांचे मुखिया झाले आहेत का? ते शरद पवारांचे दलाल झाले आहेत का माझा त्यांना सवाल आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राऊत शरद पवार गटाचे काही भाग आहात का हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. तुम्ही राहतात उबाठात खातात शरद पवारांचे आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल भूमिका मांडतात. शरद पवार हे अजित पवारांचा अपघात झाले म्हणाले असताना तुम्ही त्याबद्दल शंका उपस्थित करताय तुम्ही कुठल्या कुटुंबाचे मुखिया आहात हे तुम्ही स्पष्ट केले पाहिजे. त्यांना प्रवक्ते, मुखिया, दलाल म्हणून नियुक्त केले आहे का? असा खोचक सवाल बन यांनी केला आहे. राऊतांनी इतरांची प्रवक्तेगिरी बंद करावी नवनाथ बन म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. संजय राऊत यांचे दोन पाय राष्ट्रवादीत तर हात काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचे डोकं तरी उबाठामध्ये आहे का हा माझा सवाल आहे. सातत्याने वेगवेगळ्या भूमिका घेणं हे त्यांचे काम झाले आहे, त्यांनी उबाठामध्ये डोकं तरी ठेवले आहे का? आपले डोकं त्यांनी डाव्याच्या बाजूला नेऊन ठेवले आहे का हे सांगितेल पाहिजे. इतरांची प्रवक्तेगिरी करणे राऊतांनी बंद करावे. त्यावेळी राऊतांच्या डोक्यात प्रकाश पडेल नवनाथ बन म्हणाले की, प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राला पटेल अशीच भूमिका घेत आहेत. पण ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यावेळी तारीख अन्वर, अरुण गुजराथी, पी.ए.संगमा कोण होते? असा सवाल बन यांनी केला आहे. पटेल काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेले नाही, त्यांच्या पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार याच करणार आहेत. राऊतांनी सामनाचे मागचे संपादकीय वाचावे मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



