
Neelam Gorhe on Raj Thackeray: राज्यात सध्या दिवाळी साजरी केली जात असताना, नेतेमंडळीही आपल्या कुटुंबीयांसोबत सणाचा आनंद घेत आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असताना राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडले जात आहेत. राज्यात सर्वाधिक लक्ष लागलं असेल तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अधिकृतपणे कधी जाहीर करणार याकडे आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंना जपून पावलं टाकण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या दिवाळीतल्या फटाक्यांसोबतच राजकीय फटकेबाजीही जोरात रंगली आहे. दिवाळीच्या फराळासारखाच तिखट गोड चवीचा हा राजकीय फराळ आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. निलम गोऱ्हे यांना ‘झी 24 तास’ने फराळासंदर्भात प्रश्न विचारत त्यांची नेत्यांशी तुलना करण्यास सांगितलं असता त्यांनी काय उत्तरं दिली पाहा.
अनेक पक्ष एकत्रीकरणाचा फराळ करु पाहत आहेत असं विचारलं असता निलम गोऱ्हेंनी म्हटलं की, “कढीपत्त्यामुळे चव येते, त्यामुळे तो चिवड्यात आहे. पण तो चव येईपर्यंत असतो, नंतर काढून टाकलं जातं”.
एकनाथ शिंदे चकली आणि फटाक्यांची माळ
“फराळ चकलीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात झणझणीतपणा असतो. लाडू खाल्ल्यानंतर आपण चकली उचलतो. चकली म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण राजकारणाला चव आली आहे,” असंही त्यांनी म्हटलं. तसंच मी त्यांना अजून एक उपमा देईन ती म्हणजे 10 हजार फटाक्यांची माळ जशी असते. काही फटाक्यानंतर थोडं अंतर येतं आणि लोकांना वाटतं आता काय होणार, त्याच्या पुढे राजकारणात त्यांचा धमाका असतो. त्यामुळे डोळे दीपून जावे आणि लोकांना पुढे काय होणार याची वाट पाहावी तशा प्रकारचं एकनाथ शिंदेचं राजकारणातील वैशिष्ट्य आहे. चकलीशिवाय फराळ पूर्ण होत नाही आणि एकनाथ शिंदेंशिवाय राजकारण पूर्ण होत नाही असंही कौतुक त्यांनी केलं.
‘अजित पवार अनारसासारखे आहेत’
अनारस हा एक असा पदार्थ आहे जो आंबवला जातो, नंतर तो गोड आणि छान होतो. तर मी अजित पवारांना याची उपमा देईन. त्यावर मधेमधे विनोदाची खसखस ते टाकत असतात. त्यामुळे ते काय बोलत आहेत, यावर सर्वांची नजर असते.
‘बिघडलेली करंजी म्हणजे मविआ’
फुसके बार पण असतात आणि दुर्गंध सोडणारे सापही असतात असेही लोक त्यात आहेत. सकाळी 9 वाजता तो साप बोलत, डोलत असतो. टीआरपी चालतो म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे असतात, पण त्यालपीकडे दुसरं काही नसतं असं सांगत निलम गोऱ्हेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे भिजलेले फटाके आहेत, जे वाजत नाहीत. शिळा झालेला फरार असल्याने त्या दुकानांकडे कोणी जात नाहीत. बिघडलेली करंजी म्हणजे मविआ आहे अशी टीकाही त्यांनी केली.
“राज ठाकरे फार मोठे नेते आहेत. मी शुभेच्छा देण्यापेक्षा जपून पाऊल टाका असा सल्ला देईन. त्यांना अनेक वेळा ठेच लागली आहे. आमच्या त्यांच्याबद्दल सद्भावना आहेत. राजकारणातील अपरिहायर्ता म्हणून आज शिवसेनेने युती केली आहे. मातोश्रीवरुन निघाले तेव्हा त्यांच्या जवळचे बडवे नको म्हणाले होते. पण आज बडवे तिथेच बरोबर आहेत. पण भावनिक असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण लोक तात्पुरत्या गोष्टींना भूलणार नाहीत. मुळात या सगळ्यामधील अजेंडा काय आहे हे महत्त्वाचा आहे. विकासाचा अजेंडा आहे की फक्त अडवणूक करायची आणि गैरसमज पसरवायचे हे लोकांना आवडत नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.