
Mahesh Manjarekar : महेश मांजरेकर हे मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील एक प्रसिद्ध नाव असल्याने ते नेहमीच त्यांच्या कामामुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत विविध गोष्टींविषयी बातचीत केली. यावेळी त्यांनी राजकारणा संदर्भातील काही गोष्टींबाबत खळबळजनक खुलासे देखील केले. 2009 मध्ये महेश मांजरेकर यांनी मनसे पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांचा दारुण पराभव झाला. टू द पॉईंट मुलाखतीत राजकारणाबाबत मांजरेकरांना (Mahesh Manjarekar) प्रश्न केला असता त्यांनी, ‘राजकारण आवडतं पण निवडणूक नकोशी वाटते’ असं सांगितलं.
निवडणुकीविषयी काय म्हणाले मांजरेकर?
महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मला राजकारण खरंच आवडतं पण निवडणूक नकोशी वाटते. मला ती निवडणुकीची प्रोसेस नको वाटते. निवडणूक लढवण्याची हौस कायमची फिटली माझी. राजकारणात मोजून मापून बोलावं लागतं आणि मला तेच करता येत नाही. मला मोजून मापून बोलता येत नाही त्यामुळं अडचण होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे माझे खूप चांगले मित्र त्यामुळे राजकारण हे खूप जवळून बघितलंय. मी राजकीयदृष्ट्या सजग आहे पण आता राजकारणाची आणि निवडणुकीची भीती वाटते’. महेश मांजरेकर यांनी 2009 मध्ये राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता.
एमएलसी किंवा सांस्कृतिक मंत्री केलं तर आवडेल :
महेश मांजरेकरांना निवडणुकीची भीती वाटतं असली तरी निवडणूक न लढवता मला कोणी विधानपरिषदेवर संधी दिली तर मला आवडेल असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.मांजरेकर म्हणाले की, ‘मला कोणीतरी एमएलसी केलं किंवा सांस्कृतिक मंत्री केलं तर ते मला आवडेल. सांस्कृतिक खातं यासाठी कारण मला माहितीये ते काम कसं केलं जाऊ शकतं. पण मला ती निवडणुकीची प्रोसेस नको वाटते’.
बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ऑफर :
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट महेश मांजरेकर यांनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांनी 2009 मध्ये दिलेल्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला. बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेलो असताना त्यांनी शिवसेनेत येण्याची गळ घातली. ‘तू मला शिवसेनेत हवायस असं म्हंटलं होतं’ असं मांजरेकर म्हणाले. पण राज ठाकरेंशी मैत्री असल्यानं त्या मैत्रीखातर आपण शिवसेनेत गेलो नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी बाळासाहेबांना थेट नकार देता आला नाही त्यामुळं आपण तीन दिवस फोन बंद ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.
FAQ :
महेश मांजरेकर यांनी राजकारणात कधी आणि कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली होती?
उत्तर: महेश मांजरेकर यांनी २००९ मध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता.
महेश मांजरेकर यांना राजकारणात कोणत्या पदाची आवड आहे?
उत्तर: निवडणूक लढवण्याची हौस नसली तरी, एमएलसी (विधानपरिषद सदस्य) किंवा सांस्कृतिक मंत्री केले तर त्यांना आवडेल. त्यांनी म्हटले की, “मला कोणीतरी एमएलसी केलं किंवा सांस्कृतिक मंत्री केलं तर ते मला आवडेल. सांस्कृतिक खातं यासाठी कारण मला
बाळासाहेब ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना काय ऑफर दिली होती?
उत्तर: २००९ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना शिवसेनेत येण्याची आणि निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. त्यांनी म्हटले की, “बाळासाहेब म्हणाले, ‘तू मला शिवसेनेत हवायस’. पण राज ठाकरेंशी मैत्री असल्याने मी शिवसेनेत गेलो नाही.” थेट नकार देऊ शकलो नाही, म्हणून तीन दिवस फोन बंद ठेवला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.