
Anjali Damania : शेतकऱ्याला छळुन कवडी मोलाच्या दराने जमिनी घेतल्या. जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोपट घनवट यांना माझे आव्हान आहे. संजय उर्फ आनंदच्या नावाने प्रतिज्ञा पत्र करून घेतली जातात. राजकीय ताकत वापरून लोकांच्या जमिनी लुटणाऱ्या या बिल्डरची चौकशी झाली पाहिजे. मयत व्यक्तीना जिवंत दाखवून व्यवहार करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी फोन केले होते. त्या शेतकरी महिला रडत आहेत. खेड तालुक्यात यांची खूप जमीन आहे. आमची दोन कोटी रुपयांची जमीन जबरदस्तीने घेतली आहे. असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
शेतकरी राजेंद्र सोनवणेचा आरोप काय?
आमच्या वडिलांना पोपट घनवट यांनी फोन केला होता. त्यानंतर काही वेळांनी वडिलांना अचानक अटॅक आला. त्यानंतर त्यांनी मला बंदूक दाखवून जमीनच्या कागद पत्रांवर सह्या करण्यासाठी जबरदस्ती केली. त्यांनी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. त्या जमिनीला त्यांनी कंपाऊंड मारले असून आता आम्हाला 10 वर्षांपासून त्या जमिनीमध्ये जाता येत नाही.
अशा 11 लोकांच्या जमिनी घेतल्या आहेत. राजकारण्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची सुपारी देण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यावेळी पोपट घनवट ही त्यांच्यासोबत होते.
सर्व प्रकरणाची चौकशी करून बावनकुळेंनी त्यांना न्याय द्यावा
अनेक लोकांकडून ज्यामध्ये 11 लोक माझ्यापर्यंत येऊ शकली. राजेंद्र घनवट, पोपट घनवट आणि राज घनवट यांनी प्रचंड शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आहेत. सगळ्या यंत्रणा यांच्यासाठी काम करतात. सगळीकडे धनंजय मुंडे यांनी बऱ्यापैकी फोन करून आणि दहशत निर्माण करून त्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. म्हणून मी चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटते की, कुठेतरी एखादे काम योग्य करणं हे मंत्र्याकडून अपेक्षित आहे. ते करून घेण्यासाठी मी लढा देईन असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.