digital products downloads

राज्यस्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या मुलींचा संघ उपविजेता: राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत मिळवले यश, मुलींच्या सांघिक खेळाचे कौतुक – Amravati News

राज्यस्तरीय हँडबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावतीच्या मुलींचा संघ उपविजेता:  राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत मिळवले यश, मुलींच्या सांघिक खेळाचे कौतुक – Amravati News


नांदेड येथे नुकत्याच झालेल्या ४७ व्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत अमरावती मुलींच्या जिल्हा संघाने अप्रतिम सांघिक खेळाच्या आधारे उपविजेतेपदावर ताबा मिळवला. या स्पर्धेत अमरावती संघाने गडचिरोली, जालना, कोल्हापूर, नांदेड, मुंबई संघावर सहज विजय प्राप्त कर

.

उपविजेत्या अमरावती मुलींच्या जिल्हा संघात कर्णधार सलोनी यादव, श्रावणी निर्मल,आर्या झाडे, इशिका कावळे, प्रज्ञा कोसे, श्रावणी मुन, आराध्या चौधरी, म्रिदिनी ठाकरे, मीनाक्षी वानखडे, स्वरा ठाकरे, नेहा डुकरे, संयुक्ता भोकरे, परिदी तिडके, मुग्धा बंड, राधिका शेंडगे, श्रुती वाघमारे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संपूर्ण स्पर्धेत अमरावती महिला संघ अंतिम सामन्यापर्यंत पराभूत झाला नाही, हे विशेष. चंद्रपूर संघाने अंतिम क्षणांत उत्तम रणनितीसह काही चांगले आक्रमण केल्यामुळे तसेच त्यांच्या काहीशा वेगवान खेळामुळे अमरावतीच्या मुलींचा संघाला बचावाची संधीच मिळाली नाही. अन्यथा या सामन्यात अमरावतीच्या मुलींनी यश मिळवण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती.संघाचे प्रशिक्षक नितीन जाधव, संघ व्यवस्थापक प्रिया सहारे तसेच अमरावती जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ. हनुमंत लुंगे यांनी महिला संघाकडून उत्कृष्ट सराव करून घेतला.

मुलींच्या संघाला उपविजेतेपद मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्राचार्य डॉ. हर्षद मालधुरे, क्रीडा शिक्षक धरम पडोळे, संजय बाळापुरे, डॉ. सुगंध बंड, डॉ. हरीश काळे, आनंद उईके, राहुल रामटेके, कार्तिक मरसकोल्हे व संकेत बोके यांनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.दरम्यान मुलींच्या संघाने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशिक्षक आणि शाळा प्रशानाकडून देखील मुलींच्या संघाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, मुलींना खेळासाठी हवे असलेल्या सर्व साहित्य पुरवण्यात येईल. त्यांना कुठल्याही गोष्टींची कमी पडणार नाही. असे प्रशासनाने सांगितले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp