
राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम हे वाळू चोर असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत बोलताना केला. या प्रकरणी त्यांनी योगेश कदम यांच्या चोरीचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचा दाव
.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यात ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पोलिसाला निलंबित करण्याचे अधिकार आहेत. कोणत्याही लोकसेवकाने गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई करता येते. आमदार व मंत्रीही लोकसेवकाच्या व्याख्येत बसतात. महसूल राज्यमंत्र्यांनी (योगेश कदम) वाळू पकडल्याची 5 प्रकरणे मी तुम्हाला (बावनकुळे) पुढील 3 दिवसांत देतो. त्याचे पुरावेही सादर करोत. त्यांच्यावर कारवाई करून हे राज्य सरकार आपला कणखरपणा दाखवणार आहे का?
ते पुढे म्हणाले, महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली. ती वाळू तुमच्या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांकडे द्यायला हवी. त्यापैकी 5 ब्रास वाळू गरिबांना द्यायला हवी. पण इथे तसे झाले नाही. त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे की, जी हिंमत एक कणखर महसूलमंत्री तलाठी, तहसीलदार व आरटीओ अधिकाऱ्यांच्या बाबतीत दाखवतात, ती हिंमत ते महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवतील का?
महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का?
महसूल मंत्र्यांनी संबंधित ठिकाणाला भेट दिल्याचे पुरावे, तिथल्या नोंदी व अहवालांची कॉपी मी सभागृहाला देतो. त्यानंतर महसूल राज्यमंत्र्यांना निलंबित कराल का? त्यावेळी हिंमत दाखवाल का? माझा महसूल मंत्र्यांना प्रश्न आहे की, आमच्यावर कारवाई करताना जी हिंमत दाखवता, ती महसूल राज्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवाल का? छोटी चिलटे मारू नका. मोठा गडी मारा. असे केल्यास आम्ही तुमच्या हिंमतीची दाद देऊ. तुम्ही ताकदवान नेते आहात. आज तुमच्या माध्यमातून सभागृहाला नव्हे तर महाराष्ट्राच्या संपूर्ण 12 कोटी जनतेला कळू द्या की, महसूल राज्यमंत्र्यांचीही चोरी असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे अनिल परब यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून म्हणाले.
योगेश कदम शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र
दरम्यान, योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या गोटातीलही मानले जातात. त्यामुळे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
हे ही वाचा…
बीड लैंगिक शोषण प्रकरणाची SIT चौकशी:महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होणार तपास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बीड येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. प्रस्तुत प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.