
कराड तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने कराड
.

कराड परिसरातील वीट भट्ट्यांचे मोठे नुकसान
विटासाठी लागणारा कच्चामाल देखील या पावसामुळे पाण्यात गेला आहे. शास्त्रीनगर येथील रानडे हॉस्पिटल समोर बाभळीच्या झाडाच्या फांद्या पडल्याने पाच चारचाकी तर चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे पिकांना देखील मोठी झळ बसली आहे.

कराड-पाटण मार्गावरील सुपने (ता. कराड) येथील भुईसपाट झालेले मक्याचे पीक
बऱ्याच वर्षांनी कराड शहराला वळवाचा जबरदस्त तडाखा मंगळवारी सायंकाळीनंतर बसला. या पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. कराडसह आगाशिवनगर येथे झाड विजेच्या खांबावर पडल्याने विद्युत वाहक तारा तुटल्या होत्या. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. हातगाडा चालकांसह भाजीपाला विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळातच सर्वत्र पाणीपाणी झाल्याने अनेकांची पळापळ झाली. पावसामुळे महामार्गाच्या उपमार्गासह कराड-ढेबेवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.
पाण्यामधून वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली होती. मोठ मोठे फलक व होर्डिंग रस्त्यावर पडले होते. तर काही फलकांचे कापड वाऱ्याने उडून गेले होते. तसेच काही घरांवरील पत्रा उडून बाजूला पडला होता. झोपडपट्टीतील अनेक घरांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले.
शास्त्रीनगर येथील रानडे हॉस्पिटल समोर असणाऱ्या अन्सारी मोटर गॅरेज येथे दुरुस्तीसाठी आलेल्या पाच चारचाकी वाहनांवर व तिथे असणाऱ्या चार दुचाकींवर बाभळीचे झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर मलकापूर शहरातील सकल भागात असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले.
ढेबेवाडी फाट्यावरील सरिता बाजार समोर तसेच महामार्गावर कोल्हापूर नाका, शिवाई पतसंस्था, भारत मोटर्स, पाचवड फाटा या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.