
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. बुधवारी 28 मे एकाच दिवशी राज्यात 86 नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईत 36, ठाण्यात 24 तर पुण्यात 9 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. तर
.
राज्यात बुधवारी एकूण 86 कोविडबाधित रुग्ण सापडले असून मुंबईत सर्वाधिक 36 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यामध्ये 24, पुण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 3, कल्याण 2, नवी मुंबई 4, पनवेल 4, अहिल्यानगर 2, रायगड 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
सध्या राज्यात ILI (इन्फ्लुएन्झा सदृश आजार) आणि SARI (गंभीर तीव्र श्वसन संक्रमण) या सर्वेक्षणांतर्गत संशयित रुग्णांची कोविड चाचणी केली जात आहे. यामध्ये सापडलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार दिले जात असून त्यांची प्रकृतीही स्थिर आणि सौम्य लक्षणांसह असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यातील कोरोनाची आकडेवारी
जानेवारी 2025 पासून राज्यात 8 हजार 868 कोविड चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 521 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यापैकी 132 रुग्ण बरे देखील झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 383 आहे. जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 352 रुग्ण आढळले आहेत.
सहव्याधीग्रस्त रुग्णांचा मृत्यू
राज्यात जानेवारी 2025 पासून आजपर्यंत कोरोनामुळे एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या सर्व मृत्यू झालेल्या रुग्णांना गंभीर सहव्याधी (co-morbidities) होत्या. सध्या निदान झालेले सर्व कोविड रुग्ण सौम्य लक्षणांसह असून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत.
पहिल्या रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम होता आणि त्याला हायपोकॅल्सिमिक झटके (Hypocalcemic seizures) येत होते. दुसरा रुग्ण कर्करोगाने त्रस्त होता. तिसऱ्या रुग्णाला ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease) झाला होता आणि त्यास फिट्स येत होत्या. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोअॅसिडोसीस (DKA) आणि खालच्या श्वसन संस्थेचा संसर्ग (LRTI) होता. पाचवा रुग्ण Interstitial Lung Disease (ILD) या गंभीर फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होता. सहावा रुग्ण 47 वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.