
राज्य मंत्रिमंडळात डान्सबार कायदा सुधारणेबाबत चर्चा झाली असून डान्सबार पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार व आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी इशारा दिला आहे. सरकार जर डान्सबार सुर
.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील हे गृहमंत्री असताना डान्सबार बंदी केली होती. 2005 साली संपूर्ण राज्यात डान्सबारवर बंदी आणण्याचा निर्णय आर आर पाटील यांनी घेतला होता. मात्र, आता पुन्हा राज्यात डान्सबार सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर मंत्रिमंडळात चर्चा देखील झाल्याची माहिती आहे. नवीन कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती असून लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.
2005 साली आर आर पाटील यांनी डान्सबार बंदी केली होती. ही बंदी 2019 साली उठवण्यात आली होती. र्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आता राज्य सरकार नियमात बदल करून डान्सबार सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.
नव्या तरतुदी काय असणार?
- डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
- डिस्को आणि ऑक्रेस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार
- डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबारचा प्रतिनिधी असावा
- डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको
- बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे
- ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
- डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
- बारबालांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे
- बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
- गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था असावी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.