
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर काही ठि
.
मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील ओल्ड नागरदास रोडवर दुपारी सुमारे तीनच्या सुमारास जोरदार पावसात एक झाड रिक्षावर कोसळले. सुदैवाने रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे तो थोडक्यात बचावला. मात्र, रिक्षाचे मोठे नुकसान झाले. झाड रस्त्यावर आडवे पडल्यानं या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पुण्यात रिक्षावर पडले झाड, महिलेचा मृत्यू
पुण्यात दोन दिवसांमध्ये झाड पडून मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली आहे. निलायम टॉकीजसमोर रिक्षावर झाड कोसळले. या दुर्घटनेत 76 वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. शुभदा सप्रे असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुपारी साडेतीनच्या सुमारास निलायम ब्रीज ते नाशी फडके मार्गावर घडली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अलंकार पोलिस ठाण्याजवळ अशाच घटनेत राहुल जोशी यांचा मृत्यू झाला होता.

कोकणातही वादळाचा कहर, वाहतूक ठप्प
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याच्या जोरामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, त्यामुळे काही रस्ते काही काळासाठी बंद झाले होते. प्रवाशांना वाहतुकीच्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. काही एसटी बसही अडकून पडल्या.

दापोलीत वादळाचा फटका, घरांचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आजर्ले, आडे, पाडले परिसर वादळाने विशेषतः बाधित झाले. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोतामुळे घरांची कौले आणि पत्रे उडाले. नागरिकांना अचानक आलेल्या वादळामुळे घराबाहेर धावपळ करावी लागली. संध्याकाळी आलेल्या या वादळात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.