
गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले होते. तसेच यावेळी पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा पुढे केला असून मनसेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काही आदेशही दिल
.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या आदेशाचे पालन मनसैनिक आजपासून करताना दिसत आहेत. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली तसेच यावेळी बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेत असणे अनिवार्य करावे, अशी मागणी देखील यावेळी मनसैनिकांनी केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी बँकेला निवेदन दिले आहे. तसेच यावेळी इंग्रजी व हिंदी भाषेतील फलक देखील कार्यकर्त्यांनी उतरवले आहेत. यावेळी येथील बँकेत मराठी भाषा नसल्याचे निदर्शनास आले. आता हात जोडून येतो नंतर हात सोडून येणार, मराठी दिसली नाही तर मनसे स्टाईल दाखवणार, असा इशारा देखील यावेळी बँक मॅनेजरला देण्यात आला.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक चांगलेच पेटून उठल्याचे दिसून येत आहे. मराठीत कारभार झाला नाही तर सर्व बॅनर्स बँकेत आम्ही स्वखर्चाने लावणार. मराठी व्यवहार झाला नाही तर आणि बॅनर जर लावला नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाचा तसेच मराठीचा अपमान होत असेल तर आमचे लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील, असा इशाराच मनसैनिकांनी दिला आहे.
दरम्यान, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर हुजूरपागा, नू. म. वि. शाळेजवळ वाहतुकीचे नियम कळावेत म्हणून अनेक ठिकाणी वाहतूक शाखेकडून फलक लावले आहेत. परंतु ही सर्व फलक इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे याचा वाहतूक शाखेला विसर पडला आहे. याच्या निषेधार्थ मनसेतर्फे निषेध करण्यात येणार असून इंग्रजी फलकावर मराठी फलक लावण्यात येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.