
Uday Samant Meet Raj Thackeray: शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट आली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांची चर्चा असतानाच या दोन नेत्यांच्या भेटीने चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या भेटीचे कारण उघड केले आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी या भेटीचे कारण स्पष्ट केले आहे.
उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, ‘आज मराठीच्या संदर्भात ज्या घडामोडी चालू आहेत. त्यांसंदर्भात राज ठाकरेंनी मला भेटायला बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन आलो होतो. महत्त्वाचा मुद्दा असा की, महाराष्ट्रात ज्या काही संस्था आहेत. बँका आहेत त्यात मराठीच्या बाबतीत निर्णय घेतला जातो. किंवा तिथे ज्या काही गोष्टी घडतात. त्याचा प्रतिबंध कसा करायचा. त्या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात मी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांशी बोलणार असून त्यात काय सुधारणा करता येतील त्या दृष्टीने निर्णय घेऊ’, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात आले आहेत. अनेक ठिकाणी मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो दादागिरी केली जाते. त्यावर काहीतरी कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं मत राज ठाकरेंचे आहे. त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलं आहे. या चर्चा मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा कानावर घालणार आहे. राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असंही सामंत यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रात जी व्यक्ती राहते तीला मराठी आलीच पाहिजे. मराठीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे. कुठेही अनादर आम्ही केलेला नाही. पण माझ्या भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे. ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि तीच शासनाचीही भूमिका आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मी राज ठाकरेंना दुसऱ्यांदा भेटत आहे. आज मराठी भाषेबाबत त्यांच्या अपेक्षा आहेत त्या जाणून घेतल्या आपल्याला बँकादेखील आवश्यक आहेत. मुद्दा आहे मराठी भाषेत बोलण्याचा आम्ही चांगल्याबाबीत बँका सोबत आहोत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.