digital products downloads

राज ठाकरेंना अर्धी मातोश्री देणार? दोन्ही भावांच्या एकत्रिकरणावरून नारायण राणेंनी डागलं टीकास्त्र

राज ठाकरेंना अर्धी मातोश्री देणार? दोन्ही भावांच्या एकत्रिकरणावरून नारायण राणेंनी डागलं टीकास्त्र

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास: नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.तसंच राज ठाकरेंना देखील नारायण राणे टोला लगावला आहे. दोन्ही भावांच्या एकत्रिकरणावरून नारायण राणेंनी टीकास्त्र डागलंय. दरम्यान त्यांच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. तसंच आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युती होणार असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान यावरून भाजप खासदार नारायण राणेंनी राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज, उद्धव ठाकरेंबाबत जनतेला काहीही पडलेलं नसल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मातोश्रीचा एक भाग देतील का? असा सवाल उपस्थित करत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

राज ठाकरे शिवसेनेसोबत गेल्यावर उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपणार असल्याचा दावा देखील नारायण राणेंनी केलाय.. त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना शिवसेनेसोबत या असं म्हणणार नसल्याचं देखील राणेंनी म्हटलंय. ठाकरे बंधूंच्या युतीवरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. 

नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केलीय.दोन्ही बंधू एकत्र आल्यास कोणताही फरक पडणार नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.. दरम्यान त्यांच्या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp