digital products downloads

राज ठाकरेंनी अर्धवट माहितीवर बोलू नये,आकडेवारीसह उत्तर देऊ- नवनाथ बन: म्हणाले- खरात असो वा पाटकर फाईल्स, कोणाचीही गय केली जाणार नाही – Mumbai News

राज ठाकरेंनी अर्धवट माहितीवर बोलू नये,आकडेवारीसह उत्तर देऊ- नवनाथ बन:  म्हणाले- खरात असो वा पाटकर फाईल्स, कोणाचीही गय केली जाणार नाही – Mumbai News



महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीने वाढली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहे. सर्वाधिक गुंतवणूक देवाभाऊमुळे महाराष्ट्रात येत आहे, राज ठाकरेंना मला सांगायचे आहे की अर्धवट माहितीची आधारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्र आणि मुंबईला पुढे घेऊन जात आहे. या विकास यात्रेत राज ठाकरेंचे स्वागत आहे, सूचना करा टीका करू नका अन्यथा आकडेवारीसह उत्तर दिले जाईल. नवनाथ बन म्हणाले की, खरात नावाच्या भोंदू बाबाचे भक्त अनेक ठिकाणी होते. पण फोटो काढले म्हणून कोणी दोषी होते असे नाही. एकही मंत्री या कृत्याला साथ दिलेली दिसत नाही. या प्रकरणी सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे. फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर कारवाई करता येणार नाही, तपास करत चौकशीअंती जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील. नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राऊत करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. नेत्यांसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा हे भोंदू लोक करत असतात. कुणालाही सोडले जाणार नाही नवनाथ बन म्हणाले की, गुढीपाडव्यानंतर जनाब संजय राऊत यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसतो आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केले आहे. देवाभाऊंचे कामच असे आहे की गेली 3 टर्म जनता त्यांचे कौतुक करते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, मग तो खरात फाईल्स असो की पाटकर फाईल्सअसो. त्यामुळे राऊतांनी देवाभाऊंचे कौतुक केले आहे. खरात फाइल्समध्ये जे कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येतील. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. अनेकांचे फोटो समोर नवनाथ बन म्हणाले की, त्या भोंदूसोबत जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत. कदाचित संजय राऊत यांच्यासोबतचे असतील मला माहिती नाही. पण फोटो असला म्हणजे संबंध असतीलच असे काही नाही. रुपाली चाकणकर यांचे वेगवेगळे फोटो समोर आले आहेत. त्या प्रकरणी सखोल तपास करत कारवाई झाली पाहिजे. राजकीय लागेबांधे आहेत म्हणून कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही ते कुणीही असो. गृहविभागाने कारवाई केली नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवण्याची काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. आमच्या काळात भोंदू बाबा असो की कुणीही चुकीचे काम करणारी व्यक्ती त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. कारवाई करण्यासाठी धाडस लागते ती गृहविभागाने दाखवली आहे. ठाकरेंनी अनेकांना पाठिशी घातले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp