digital products downloads

राज ठाकरेंनी दाखवले जादूचे प्रयोग!: VVPAT मशीनमधून मतचोरीचे दाखवले प्रात्यक्षिक; दिव्य मराठीच्या बातमीचा संदर्भ देत जोरदार फटकेबाजी – Mumbai News

राज ठाकरेंनी दाखवले जादूचे प्रयोग!:  VVPAT मशीनमधून मतचोरीचे दाखवले प्रात्यक्षिक; दिव्य मराठीच्या बातमीचा संदर्भ देत जोरदार फटकेबाजी – Mumbai News


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जादूचे प्रयोग दाखवतो म्हणत व्हीव्हीपॅट मशीनमधून कशी मतचोरी होते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर भाषणातून त्यांनी दिव्य मराठीच्या बातमीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच येत्या

.

राज ठाकरे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सभागृहात आमची बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील होते. तिथून बाहेर पडताना आम्ही दोघे सोबतच बाहेर पडलो. आमचं उठणं बसणं होणार आहे, भेट होणारच आहे. तुम्ही आता मोजत बसू नका कितवी भेट. आज मी तुमच्यासमोर जो आलो आहे, आतापर्यंत आपले अनेक बैठका झाल्या. अनेक कार्यक्रम आपण ठेवतो, विविध कार्यक्रम असतात. आज म्हणलं वेगळे काहीतरी दाखवावे. आज मी तुमच्यासाठी जादूचे प्रयोग आणले आहेत.

निवडणुकांच्या ज्या मशीन आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले, आता ज्यांच्यासाठी म्हणून पूर्ण देशभर प्रत्येक जनतेच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे, या देशातल्या निवडणुकांची त्याची एक गोष्ट तर सुरू केली आहेच दुबार मतदार यद्यांची. पण नुसते तिकडे लक्ष ठेऊन चालणार नाही. जे मी 2017 पासून ओरडून सांगतो आहे, आज जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नाही. मतदार याद्या तर आहेतच, पण या निवडणुकांच्या ज्या मशीन आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून आज मी या मशीन तुमच्या समोर आणली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी उपाध्याय आणि पटेल यांना व्यासपीठावर बोलावले.

ईव्हीएम डेमो मशीनचे प्रात्यक्षिक

यानंतर अमित उपाध्याय यांनी ईव्हीएमचे डेमो मशीनचे प्रात्यक्षिक दाखवत मतचोरी कशी होते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच आम्ही असा दावा नाही करत की अशीच चोरी खऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये चोरी होत असेल, असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले. व्हीव्हीपॅटमध्ये आता कोणतीही पावती नाही. आता मी केळी या चिन्हावर मत दिले. दूसरा मतदार आला आणि त्याने सुद्धा केळीवर मत दिले आता परत केळीची पावती दिसली. त्यानंतर आपण काय करतो एक मत कलिंगडला देतो आता कलिंगडची पावती पण दिसली. चौथा मतदार येतो त्याने सुद्धा कलिंगडला मत दिले. आता चार व्होट झाले. आता एक मत सफरचंदला देऊ, आता पाच मत झाले. आता निवडणूक संपले. तीन दिवसांनी आपण निकाल पाहणार ते असणार इलेक्ट्रॉनिक व्होट, यात काय दिसते की 3 व्होट सफरचंदला भेटले आहे. एक व्होट केळीला आणि एक व्होट कलिंगडला. पण आपण एकच मत सफरचंदला केले होते. आता आपण पावती काढून बघू, सफरचंदला दोन मत दिसते.

या चोरीला हॅकिंग नाही म्हणत. ही चोरी कशी झाली? परत आपण मतदान सुरू करू. VVPAT मध्ये आता कोणतीही पावती नाही. मशीनमधली लाइट पेटल्यावरच आपल्याला पावती दिसते. काळा काच लावला तर आधी मत केलेली पावती नाही दिसत. अशी चोरी केली जाते. आता कलिंगडाला मत दिले इकडे पावती आपल्याला दिसते. पण आता मशीनने अडकून ठेवली आहे. आता दूसरा मतदार आला आणि त्याने कलिंगडाला मत केले. नंतर काळा काच काढून आपण अंधारात पहिले तर बघा सफरचंदची पावती पडते. असे प्रात्यक्षिक अमित उपाध्याय यांनी करून दाखवले. काळा काच चोरी लपवू शकतो असा दावा उपाध्याय यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाच्या मशीनमध्ये सेन्सर

त्यानंतर काही बातम्यांच्या पुराव्यांच्या आधारे प्रात्यक्षिक दाखवताना निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये काळा काच वापरल्याचा पुरावा दाखवला. आता काळा काच नसेल तरी देखील चोरी होऊ शकते. लाइट सेन्सरच्या मदतीने मतचोरी होऊ शकते. 4 सेकंडच्या आत मतदार निघून जात असेल तर तिथे चोरी होऊ शकते. सेन्सरच्या समोर कोणीच नसेल तर 4 सेकंडनंतर दुसरी पावती खाली पडते. कारण पाहणारा तिथे कोणीच नाही, अशी प्रोग्रामिंग या मशीनमध्ये करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मशीनमध्ये सुद्धा असे सेन्सर आहेत, असा दावा यावेळी अमित उपाध्याय यांनी केले आहे.

या प्रत्यक्षिकाच्या नंतर राज ठाकरे पुन्हा बोलायला आले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, लक्ष नाही दिले तर हातात केळच देणार, असे म्हणताच एकच हशा पिकला. लोक म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मत पडत नाहीत. त्याचे कारण हेच आहे. लोक आपल्याला मतदान करत आहेत. पण या सगळ्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागत आहे. हे सगळे करून सत्तेत येणार. आपण त्यांना काय सांगत आहोत मतदार याद्या स्वच्छ करा, त्यानंतर मतदान घ्या.

दिव्य मराठीच्या बातमीचा दिला संदर्भ

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मतदार याद्या पारदर्शक झाल्यानंतर जर आमचा पराभव झाला तर आम्हाला पराभव मान्य आहे. हे तर मॅच फिक्स आहे. मॅच फिक्स असेल तर सगळ्यांना काढून टाकले जाते. इथे कोणालाच काढले जात नाही. एखादा माणूस मत कुठे करतो हे प्रायवसी आहे, पण मतदार यद्यांमध्ये कसली आली आहे प्रायवसी? मी तुम्हाला सांगतो या सगळ्या शहरांवर या लोकांचा डोळा आहे. आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा? यांच्या मनात हा विचार येतो कस? दिव्य मराठीमध्ये एक बातमी पाहिली की एक जीआर आलेला आहे. नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त नमो टुरिजम सेंटर्स काढले जात आहेत, कुठे काढली जात आहेत? रायगडावर, शिवनेरीवर! मी आत्ता सांगतो वर नाही खाली नाही, सत्तेत असो नाहीतर नसो, सेंटर उभे केले तर सोडणार नाही. मुख्यमंत्री बनवण्यासाठी किती चाटूगिरी करता? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांना लगावला.

चाटूगिरी म्हणत एकनाथ शिंदेंना लगावला टोला

मुख्यमंत्री पदासाठी चाटूगिरी किती सुरू आहे हे वर तिकडे मोदींना पण माहीत नसेल. आपण एक तारखेला मोर्चा काढत आहोत आणि दिल्लीपर्यंत कळले पाहिजे की महाराष्ट्रात काय आग पेटली आहे. शिवाजी पार्कसारखी परिस्थिती नाही तिकडे. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो, मोर्च्यात सहभागी व्हा. या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनेच पार पडल्या पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले.

आपल्याकडेच असल्या मशीन आहेत, अमेरिकेत सुद्धा बॅलेट पेपर वापरले जातात. मोर्चा झाल्यानंतर घराघरात जा. नवी मुंबई महापलिकेचे आयुक्त, त्यांचे बंगल्यावर 550 मतदारांची नोंदणी आहे! आयुक्तांच्या बंगल्यावर? एखाद्याचा पत्ता तर सुलभ शौचालयाचा आहे, बसला होता तेव्हा स्वाक्षरी घेतली का? काहीही सुरू आहे. हा पोरखेळ नाही. या जन्मात ज्या काही गोष्टी आहेत, त्यात महाराष्ट्राचे भले झाले पाहिजे यासाठी मी काम करत आहे. या मशीनमधून जर अशी चोरी होत असेल तर काय अर्थ आहे? प्रत्येक ठिकाणी जिथे दुबार वगैरे भरले आहेत, ते सगळे बदलले पाहिजेत. आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचे आहे. सगळ्यांना सोबत ही लढाई लढावी लागणार आहे.

मी स्वतः मोर्चासाठी लोकलने येणार

मी स्वतः मोर्चासाठी लोकलने येणार आहे. मागे एकदा मी डोंबिवलीवरून आलो होतो. तेव्हा मला 3 तास लागले होते. ट्रॅफिक जॅममुळे. तेव्हा मी विचार केला की आता लोकलने जावं. पण मी लोकलने प्रवास करायचो हे या पत्रकारांना माहीतच नाही. ट्रेन आली, स्लो झाली समोर महिलांचा डब्बा होता, मी फक्त चढायची अॅक्टिंग केली की सगळे पत्रकार त्या डब्ब्यात आणि मी मागच्या डब्यात शिरलो, असा किस्सा यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले आणि एकच हशा पिकला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp