
Raj Thackeray on Ajit Pawar: विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोग लपाछपी का करत आहे? अशी विचारणा केली. आम्ही निवडणूक आयोगाला मतदारयाद्या दाखवल्या आहेत, त्यात घोळ आहे. ते घोळ त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून याद्या सुधारायला हव्यात. त्यानंतरच ही निवडणुकीला सामोरं जायला हवं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला.
“निवडणूक यादीत घोळ आहे. आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ते मांडले आहेत. त्यांनी आता त्यात सुधारणा केली पाहिजे आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे. जे निवडणुका लढवतात त्या राजकीय पक्षांचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये. ही आमची अत्यंत रास्त मागणी आहे. यात काहीच गैर नाही. निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. यात वेगवेगळे कायदे आणू नयेत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “ही फार सोपी गोष्ट आहे. यात काही गुंतागुंतीचं असण्याचं कारण नाही. आम्ही कोणतीही क्लिष्ट गोष्ट बोलत नाही आहोत. आम्ही मतदारयाद्या दाखवल्या आहेत, त्यात घोळ आहे. ते घोळ त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून याद्या सुधारायला हव्यात. त्यानंतरच ही निवडणूक व्हायला हवी”.
“2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागा निवडून आल्या. 232 जागा आल्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रात व्हायला हवा होता, त्याप्रकारचा जल्लोष नव्हता. हे कसं द्योतक आहे. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा ही कसली निवडणूक आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
तुम्ही निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीसोबत दिसत आहात असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, “मला वाटतं 2017 मध्येही दिसलो होतो. तेव्हा आघाडी असेल किंवा नसेल. सध्या निवडणूक होणार, कशी होणार? हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आताचा विषयच नाही. 2017 मध्येही मी हेच बोलत होतो. त्यावेळी अजित पवारही होते. त्यांनीही आज यायला हवं होतं. तेव्हा ते तावातावाने बोलतही होते. ते सगळ्या गोष्टी सांगतही होते”.
FAQ
1) विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन काय मुद्दे उपस्थित केले?
उत्तर: विरोधी पक्षातील नेत्यांनी मतदार यादीतील घोळ दाखवून निवडणूक आयोगाला भेट दिली. राज ठाकरेंनी आयोग लपाछपी का करत आहे, ही विचारणा केली आणि मतदार यादी सुधारण्याची मागणी केली. ते सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, असे ते म्हणाले.
2) मतदार यादीतील घोळ काय आहे आणि त्याबाबत राज ठाकरेंची भूमिका काय?
उत्तर: मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत, ज्या राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडल्या गेल्या. राज ठाकरेंनी सांगितले की, हे घोळ सोपे आहे आणि राजकीय पक्षांसोबत मिळून याद्या सुधाराव्यात. सुधारणेनंतरच निवडणुका घ्याव्यात, अन्यथा ते अन्यायकारक आहे.
3) राज ठाकरेंची मुख्य मागणी काय आहे?
उत्तर: निवडणूक आयोगाने मतदार याद्या राजकीय पक्षांना दाखवाव्यात आणि सुधाराव्यात. सर्व पक्षांचे समाधान झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. ही रास्त मागणी असून, यात नवीन कायदे आणू नयेत, असे ते म्हणाले. स्थानिक निवडणुकीसाठी ६ महिने वाट पाहणेही हरकत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.