
Narayan Rane on Uddhav Raj: उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केल? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली, शिवसेना नावावर यांनी उदरनिर्वाह केला आणि आता मराठी भाषेवरुन आनंदोत्सव साजरा करत आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात विचारलं असता म्हणाले की, “दोघं सोबत राहून भविष्य असतं तर ते वेगळे झाले नसते. सत्ताधारी पक्षांकडे 235 आहे, हे काय करणार? यांना आता मराठी माणूस आठवला आहे”.
“आतापर्यंत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं आहे? मराठी माणसाची मुंबईत फक्त 18 टक्केवारी आहे. 1960 मध्ये 60 टक्के मराठी लोक होते. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी असं शिवसेना म्हणायची. मग हे मराठी कुठे गेले? उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्र, मराठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केलं?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.