digital products downloads

‘रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या मांडीवर…’; करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, ‘2009 पासून 2022 पर्यंत…’

‘रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या मांडीवर…’; करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, ‘2009 पासून 2022 पर्यंत…’

Karuna Munde On Dhananjay Munde And Pankaja Munde : बीडच्या सावरगाव घाटावरील भगवान गडावरील दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे, पंकजा आणि प्रीतम मुंडे एकत्र आलेत. महाराष्ट्रातील राजकारणातील मुंडे बहीण – भाव अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक वर्ष राजकीय वैरी असलेले हे मुंडे बहीण भाऊ जेव्हा मंचावर एकत्र येतात, तेव्हा ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या दसऱ्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या बहिणीचे कौतुक केलं. त्यानंतर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

‘रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या मांडीवर…’

दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे म्हणाले की, कठीण काळात मला माझ्या बहिणीने आधार दिला. हे वाक्य ऐकल्यानंतर करुणा मुंडेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्यात की, 2009 पासून 2022 पर्यंत जे दोन भाऊ-बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होतं. आज त्याच बहिणीला आज आधार मानतात, ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन-दोन, तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटतो का? तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, कशाप्रकारे न्याय देतील? असा सवाल करुणा मुंडे यांनी केला.

कारखाना तुम्ही बंद केला आणि गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले. आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोघा कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत पण तुम्ही देत नाही, असा गंभीर आरोपही करुणा मुंडेंनी यावेळी केला आहे.

त्या पुढे म्हणाल्यात की, आज पण तुमच्या सभांमध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक कराडशिवाय ना हलत होतं, ना हलणार.., त्यासाठी आज तुम्हाला परळीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नको आहे. जे गुंडागर्दी संपवतील. जरी माझ्यासारखा कोणी नवीन आला तर तो गुंडागर्दी संपवेल, राजकारण आहे ते संपवतील. त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई-बहीण एकत्र आलेले आहे. कोणत्याही जनतेची सेवा, शेतकऱ्यांची सेवेसाठी तुम्ही एकत्र आलेले नाही, असाही गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला.

धनंजय मुंडे दसरा मेळाव्यात काय म्हणालेत?

मेळाव्याच्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की, गेले 250 दिवस माझी वाईट मानसिकता झाली होती. माझी बहीण माझ्या जवळ येऊन तास न् तास बसत होती. ज्या काळात मीडिया ट्रायल सुरू होतं, त्यावेळी माझ्या बहिणीने आधार दिला. माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असे विधान धनंजय मुंडेंनी केले होते. धनंजय मुंडे यांच्या याच विधानावर करुणा शर्मा-मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाऊ-बहिणीच्या संबंधांवर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीच्या मुद्द्यांवरून टीका केली आहे.

कोण आहेत करुणा मुंडे?

करुणा मुंडे हे नाव पहिल्यांदा 2021 मध्ये चर्चेत आलं. धनंजय मुंडे यांचं नाव घेत थेट त्यांच्यावर बलात्काराचे आरोप एका महिलेनं सोशल मीडियावरून केले होते. त्यानंतर करुणा शर्मांसोबत असलेलं नातंही उघड केलं होतं. तेव्हा धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मासोबत परस्पर संमतीने संबंध असून याची माहिती कुटुंबियांना असल्याचं सांगितलं होतं. करुणा यांच्या मुलांनाही माझं नाव दिलंय असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

FAQ

1: ही घटना कुठे आणि कशासाठी घडली?
उत्तर: ही घटना बीड जिल्ह्यातील सावरगाव घाटावरील भगवान गडावर दसरा मेळाव्यात घडली. येथे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे एकत्र आले. महाराष्ट्र राजकारणात मुंडे बहिण-भाऊ महत्त्वाचे असल्याने त्यांच्या एकत्र येण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

2: धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात काय म्हटले?
उत्तर: धनंजय मुंडे यांनी भाषणात सांगितले की, गेल्या २५० दिवसांत त्यांची मानसिकता खराब झाली होती. कठीण काळात बहिण पंकजा मुंडे यांनी तासानुवृत्ते बसून आधार दिला. मीडिया ट्रायलच्या वेळी बहिणीने आणि महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असे त्यांनी कौतुकाने सांगितले.

3: करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काय टीका केली?
उत्तर: करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विधानावर तीव्र टीका केली. २००९ ते २०२२ पर्यंत दोन भाऊ-बहिणी एकमेकांसाठी कट-कारस्थान रचत होते, आज तेच आधार मानणे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना पंकजा न्याय देतील का, असा सवालही केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp