
भागवत कथा श्रवण केल्यानंतर मानवाचे जीवन पवित्र होते, तर रामकथा केवळ ऐकण्यासाठी नसून प्रभू श्रीरामांच्या आदर्श मार्गावर चालण्याचा संदेश देते असे प्रतिपादन प. पूज्य रमेशभाई ओझा यांनी शुक्रवारी ता. २० येथे केले. येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेशभाई ओझा यांनी अनेक दाखले देत भागवत कथा मानवाच्या जीवनात काय परिवर्तन घडवून आणते यांचे स्पष्टीकरण दिले. रामायण व महाभारतातील उदाहरणे देत सांगितले की, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांसारख्या अवतारांनाही जीवनात अनेक दुःख व संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे फारसे मोल नाही, तर त्यातून मार्ग काढण्याची शिकवण महत्त्वाची आहे. भगवान श्रीरामांनी आपल्याला संकटांशी लढण्याची प्रेरणा दिली, तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील संघर्षात कसे झुंजायचे, याचे तत्त्वज्ञान दिले असल्योच सांगत त्यांनी दोन्ही अवतारांच्या जीवनातील गुढ अर्थ उलगडून सांगितला. भागवत कथेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, भागवत कथा हीच सर्वोत्तम साधना आहे. भागवत आणि रामकथेचे आयोजन आपण का करतो? त्यामागचे खरे प्रयोजन काय आहे?” यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आत्मपरिवर्तनासाठी कथा ऐकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे हि देखील एक प्रकारची भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



