
विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी बांधलेला एक पूल उद्घाटनापूर्वीच वाहून गेल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात विंचरणा नदीवरील लोखंडी
.
रोहित पवार गत काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी नुकतीच एका कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली होती. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे विंचरणा नदीवर बांधण्यता आलेला लोखंडी पूल वाहून गेल्याचा दावा केला आहे.
आाम्ही आमची स्टाईल व स्वभाव बदलणार नाही
रोहित पवार यासंबंधी बोलताना म्हणाले, कामाच्या निकृष्ट दर्जामुळं आमसभेत अधिकाऱ्यावर ओरडल्याबद्दल अनेकांनी गळे काढले पण कशी बोगस कामं होतायेत ते बघा… प्रा. राम शिंदे यांच्या निधीतून 3 कोटी रुपये खर्चुन विंचरणा नदीवर उभारलेला लोखंडी पूल उद्घाटनाआधीच रात्री पावसाच्या पाण्यात वाहून गेला. पाऊस जोरदार सुरुय पण त्यात काल पूर्ण केलेलं कामही सहज वाहून जात असेल तर याबाबत बोलायचं नाही? बोगस कामामुळंच सामान्य जनतेच्या टॅक्समधून कोट्यवधी रुपये खर्चून केलेलं काम वाहून जात असेल तर ही कामं काय केवळ टक्केवारी घेण्यासाठी मंजूर केली जातात का? मग यामुळंच आमचं डोकं गरम होतं आणि पुढंही ते होत राहील. आम्ही जमिनीवर राहून लोकांसाठी लढणारे असल्याने कुणाला बरं वाटावं म्हणून आम्ही आमची स्टाईल आणि स्वभाव बदलणार नाही.
जीएसटी दर कपातीवरून सरकारवर टीका
दुसरीकडे, रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे जीएसटी घटीला बचत उत्सव मानणाऱ्या सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मागील 8 वर्षे जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापला आणि आजपासून खिसा कापणे काही प्रमाणात कमी करण्याच्या या निर्णयाला दिवाळी गिफ्ट, जीएसटी बचतीचा शुभारंभ म्हणणारं केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, असंच म्हणावं लागेल, असे ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, आज वृत्तपत्रातल्या या जाहिराती व्यवस्थित बघा. गेली आठ वर्षे किराणा सामान, शार्पनर, वही, पेन यापासून देवाच्या अगरबत्तीपर्यंत, विमा हफ्त्यापासून, औषधे, कपडे-चपला तर शेतीच्या खतांपर्यंत भरमसाठ प्रमाणात GST आकारून केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात जवळपास 110 लाख कोटीहून अधिकचा गल्ला जमवला. त्यात एकट्या महाराष्ट्रातून 20 ते 25 लाख कोटी रुपयांचा वाटा आहे.
सरकारला जीएसटी सुधारणांची उपरती झाली
गेली आठ वर्षे जीएसटी च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापला आणि आजपासून खिसा कापणे काही प्रमाणात कमी करण्याच्या या निर्णयाला दिवाळी गिफ्ट, जीएसटी बचतीचा शुभारंभ म्हणणारं केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, असंच म्हणावं लागेल. आज देशात सरकारविरोधातल्या वाढत्या असंतोषामुळे केंद्र सरकारला आपल्याच कर्माची फळं भोगायची वेळ जवळ आल्याची चाहूल लागल्याने तसेच शेजारपाजारची परिस्थिती लक्षात आल्याने जीएसटी दरात सुधारणा करण्याची उपरती झाली…. असो..! उशिरा का होईना, सरकारला जाग आली हे महत्वाचं आहे, त्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन!
‘‘जीएसटी सुधारणा हे क्रांतिकारी पाऊल असून वस्तूंच्या किमती कमी होणार, देशांतर्गत मागणी वाढणार’’ असल्याची प्रतिक्रिया देत महागाई वाढल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली होती हे वास्तव अप्रत्यक्षपणे मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही विशेष अभिनंदन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.