
संभाजीराजे छत्रपती यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एका स्टेडियमच्या कामासंदर्भात ही भेट घेतल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. संभ
.
महसूल मंत्री बावनकुळेंच्या भेटीबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आज चंद्रशेखर बावनकुळेंसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. आम्हाला महसूल विभागाकडून 30 एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी ही भेट घेतली, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. बावनकुळे यांचे आभार. असोसिएशनची फाईल मंजूर करावी, असे त्यांना म्हटले. त्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे, असेही संभाजी राजे म्हणाले.
शिल्प हटवण्याची माझी पहिल्यापासूनच भूमिका
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांना वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाबाबतच्या त्यांच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता, कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजुला तो उभा केला आहे. दंतकथेतून निर्माण झालेले ते पात्र आहे. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवावे, अशी माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. तुकोजीराव होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली होती, कुत्र्याच्या समाधीला नाही. तुकोजीराव होळकरांचे नाव सोनेरी अक्षराने तिथे लिहायला पाहिजे, याची जबाबदारी मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील लवकर समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले.
अमित शहांच्या दौऱ्यामुळे विषय थांबवला होता
मुख्यमंत्री देखील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज किंवा उद्या मला वेळ देणार आहेत. तेव्हा माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड येणार होते, त्यामुळे मी थोडावेळ विषय थांबवला होता. वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्याबाबत आमची कुठलीही डेडलाईन नाही, असे स्पष्टीकरण संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. पण दंतकथेतून तयार झालेला तो कुत्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजुला राहणे चुकीचे आहे. त्यामुळे हा माझा प्रयत्न आहे. सरकार याबाबत दखल घेईल अशी अपेक्षा असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.