
Ajit Pawar: सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूत्र फिरवली असून अजित पवारांचे तीन माजी आमदार आणि काँग्रेसचे एक माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
सोलापुरात ऑपरेशन लोटसवरुन राजकारण तापलेलं असताना तिकडे राष्ट्रवादीनंही डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु केलाय.. यासाठी अजित पवारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यासाठी पाठवलं. या बैठकीला माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दांडी मारली. तर बबनराव शिंदे यांची पुत्र रणजित शिंदे मात्र या बैठकीला उपस्थित होते. यावेळी सोलापुरातील नेत्यांना अजित पवारांनी काय काय दिलं याची आठवण भरणेंनी करुन दिली.
ऑपरेशन लोटसमुळे राष्ट्रवादीत धावाधाव असताना तिकडे सोलापूर भाजपमध्येही उद्रेक उफाळून आला. पार्टी विथ डिफरन्स म्हणणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणा-या नेत्यांना पक्षात प्रवेश नको असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातून संताप व्यक्त केलाय..
काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपमधून मोठा विरोध झाला. भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. असं असतानाही हा सगळा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. तर दुसरीकडे अजित पवारांना ऑपरेशन लोटस रोखण्यात यश येणार का याकडंही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
कोणकोणते नेते भाजपच्या वाटेवर?
यशवंत माने
मोहोळचे माजी आमदार, राष्ट्रवादी
बबन शिंदे
माढ्याचे माजी आमदार, राष्ट्रवादी
राजन पाटील
मोहोळचे माजी आमदार, राष्ट्रवादी
दिलीप माने
सोलापूर दक्षिणचे माजी आमदार, काँग्रेस
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.