
NCP Nation first: ऑपरेशन सिंदूरवरून इंडिया आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तडजोड नसल्याचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय. इंडियाच्या बैठकीतील गैरहजरीवर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतर आता चर्चांना उधाण आलंय.
राष्ट्र प्रथम ही भाजप आणि संघ परिवाराची भूमिका राहिलीये. भाजपच्या बहुतांश मित्र पक्षांचाही तशीच भूमिका आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालीय. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही हीच भूमिका घेतलीये. राष्ट्रवादीसाठी राष्ट्र प्रथम असल्याची भूमिका शरद पवारांच्या पक्षानं घेतलीय. भाजपचीही राष्ट्र प्रथम अशी भूमिका आहे. तिच भूमिका शरद पवारांच्या पक्षानंही मांडलीये.
ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेस बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कोणताही प्रतिनिधी गेला नव्हता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गैरहजेरीनं त्या पक्षाची भूमिका वेगळी आहे का अशी चर्चा सुरु झाली होती. खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत अगदी स्पष्टच सांगितलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी देश प्रथम असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय.
शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुरोगामी भूमिका राहिलीये. एका बैठकीला शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी हजर राहिला नाही तर त्यांची भूमिका बदलली असा निष्कर्ष काढता येणार नाही असं काँग्रेसनं म्हटलंय.
शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आहे. अजित पवारांच्या पक्षाचं आणि शरद पवारांच्या पक्षाचं एकत्रिकरण झाल्यास शरद पवारही भाजपसोबतच गेल्यासारखं होईल. अजित पवारांकडं अवघा एकच खासदार आहे. या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं 10 खासदार आहेत.
भाजपला शरद पवार नकोत असंही नाही. भविष्यातल्या संभाव्य आघाडीसाठी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सुरु तर नाही ना अशीही शंका घेण्यास वाव आहे. आता राष्ट्र प्रथम म्हणणारी शरद पवारांची राष्ट्रवादी देशहिताच्या मुद्यावर भाजपसोबत जाईल का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणास सुप्रिया सुळेंची संमती?
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांची काय भूमिका असेल अशी उत्सुकता सर्वच कार्यकर्त्यांना होती. या उत्सुकतेवरुन आता पडदा हटला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला सुप्रिया सुळे यांनी मूक संमती दिली आहे. पक्ष घेईल ती भूमिका मान्य असल्याचं सांगून सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला हिरवा कंदिल दाखवला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत अचानक एकत्रिकरणाचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकत्रिकरणावर कुणीही थेट बोललं नसले तरी दुसऱ्या फळीतले नेते एकत्रिकरणासाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येतं आहे. कार्यकर्त्यांना देखील आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाबाबत उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना चर्चा करुन घ्यायचा आहे असं सांगून टाकलं होतं. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात जर काही व्हायचे असेल तर ती पांडुरंगाची इच्छा असं सांगून टाकलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होईल असं काँग्रेस नेत्यांना वाटत नाही. पण शरद पवार यांचं राजकारण पाहिलं असल्यानं काँग्रेस काहीशी सावध असल्याचं पाहायला मिळतं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे काकापुतण्या एकत्र येण्यासाठी पक्षाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतं आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या पातळीवर कोणताही संघर्ष दिसत नाही. उलट एकमेकांबाबत पुरक भूमिका घेताना राष्ट्रवादीचे नेते दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची हीच ती वेळ हीच ती घटिका असल्याचं सांगण्यात येतं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.