
Kunal Kamra Remarks on Maharashtra DCM Eknath Shinde: आपल्या वादग्रस्त भूमिका आणि विधानांमुळे चर्चेत असलेला स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदेंवरील या वादग्रस्त विधानाचे पडसाद रविवारी रात्री उमटले. ज्या सेटवरुन कामराने हा शो केला त्या खारमधील हॉटेलमधल्या सेटवर शिवसैनिकांनी तोडफोड केली. राज्यातील अनेक पोलीस स्थानकांमध्ये कामराविरोधात तक्रार शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली आहे. या टीकेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. असं असतानाच कुणाल कामरानेही या प्रकरणावरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संविधानाची प्रत दाखवत फोटो पोस्ट केला. यावरुनही फडणवीसांनी निशाणा साधला आहे.
राड्यानंतर कुणालची पहिली प्रतिक्रिया
कुणाल कामराने शिंदेंवर टीका केल्यानंतर वाद सुरु झाल्याने त्याने हातात संविधानाची प्रत पकडलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. ‘पुढे जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,’ असं कुणालने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
The only way forward… pic.twitter.com/nfVFZz7MtY
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
…तर ते सहन केलं जाणार नाही: फडणवीस
एकनाथ शिंदेंवर बनवलेल्या वादग्रस्त गाण्याबद्दल बोलताना फडणवीसांनी निशाणा साधला आहे. “मी असं मानतो की कॉमेडी करण्याचा अधिकार आहे. आमच्यावरही व्यंग करा यात काही वाईट वाटणार नाही. मात्र मुद्दाम एवढ्या मोठ्या नेत्यांना बदनाम करण्याचं कोणी काम करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ‘कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या..’, शिंदेंना ‘गद्दार’ म्हटल्याने फडणवीसांचा संताप; म्हणाले, ‘एवढ्या..’
राहुल गांधींचा उल्लेख करत साधला निशाणा
“ते ज्याप्रकारे संविधानाचा फोटो दाखवून ट्विट करत आहे. हे तेच लाल संविधान आहे जे राहुल गांधी दाखवतात. हे राहुल गांधींचं संविधान ना त्यांनी वाचलंय ना कामराने वाचलं आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला. “अशा संविधानाचा फोटो वापरुन तुमची चूक तुम्ही लपवू शकत नाही. कारण याच संविधानाने म्हटलं आहे की, स्वातंत्र्य अबाधित आहे. मात्र त्यावर मर्यादाही येतात जर त्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यामुळे गदा येत असेल तर अशा स्वतंत्र्यावर मर्यादा येतात. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणू शकत नाही. राहुल गांधींचं संविधान दाखवून तुम्ही तुमच्या वाईट कर्मांपासून वाचू शकत नाही,” असं फडणवीस यांनी कुणाल कामराला इशारा देताना म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.