digital products downloads

राहुल गांधींचा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न: देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला; मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक निदर्शने – Mumbai News

राहुल गांधींचा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न:  देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला; मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक निदर्शने – Mumbai News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे गंभीर मुद्द्यांवर तथ्याधारित चर्चा करण्याऐवजी सातत्याने खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींना बोलायचे नसून केवळ आरोप करायचे आहेत. आपल्या देशाला, आपल्या लष्कराला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी चढवला. असे आरोप करून ते फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत तीव्र निदर्शने करण्यात आली. सरकार आणि पंतप्रधान मोदी काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना घाबरत असल्याचा दावा या आंदोलकांनी केली आहे. या वेळी या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव राज्यातील लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. या विषयावर विविध स्तरांतून मागण्या येत असल्याचे मान्य करताना, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. ही योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असून तिच्याशी संबंधित कोणताही बदल हा चर्चेतून आणि सामूहिक निर्णयातूनच केला जाईल, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. बसून सविस्तर चर्चा करू लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक सूचना, मागण्या आणि अपेक्षा सरकारपुढे येत आहेत. काहींकडून योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी होत असताना, या मुद्द्यावर भावनिक किंवा राजकीय दबावाखाली निर्णय होणार नाही, असा स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिला. या संदर्भात बसून सविस्तर चर्चा करू. योजना कोणाच्या नावाने असावी, यापेक्षा तिचा लाभ महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतोय का, हा खरा मुद्दा आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. विरोधकांकडून केवळ आरोपांचे राजकारण सुरू फडणवीस म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेशी आणि प्रतिष्ठेशी संबंधित विषयांवर राजकारण करणे योग्य नाही. राहुल गांधींकडून होणारी वक्तव्ये ही जबाबदार नेतृत्वाला साजेशी नसून ती देशहिताला धक्का पोहोचवणारी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या सामाजिक योजनांबाबत सरकार संवेदनशीलतेने निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून केवळ आरोपांचे राजकारण सुरू आहे, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp