
मुंबई : लोकल दुर्घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. तर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुंबईतल्या दिव्या आणि मुंब्रादरम्यान हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. या लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 9 प्रवासी हे जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर आता सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांवर सडकून टीका केली. देशाचे रेलमंत्री नव्हे तर रिलमंत्री असल्याचं शरसंधान आदित्य ठाकरेंनी साधलं. तर दुर्घटनेची जबाबदारी ही रेल्वे विभागाचीच असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे लोकल दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील रेल्वे प्रशानावर खापर फोडलं आहे. रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि बाहेरून येणारे लोंढ्यामुळे मुंबईची ही परिस्थिती झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान या घटनेची रेल्वे मंत्रालयांकडून चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
दिवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिव्यापासून काही लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच कल्याण, डोंबिवलीमध्येच लोकल फुल होतात त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्र्यात प्रवाशांसाठी जागाच शिल्लक राहतात नाही. त्यामुळे लोक जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
लोकल दुर्घटनेची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील अनेकदा गर्दीमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढते आहे. कसारा, खोपली, पालघर, विरारवरून मुंबईत येण्यासाठी एकमेव पर्याय हा लोकलच आहे. या परिसरात देखील गर्दी वाढतेय. मात्र, लोकल मर्यादितच आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रशासन कसं नियंत्रण मिळवणार? असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. त्यामुळे प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना रेल्वे प्रशासनानं कराव्यात जेणेकरून वारंवार अशा घटना होणार नाहीत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.