digital products downloads

रोहित शेट्टीच्या घरावर गाेळीबार; पुण्यातील पाच आरोपी ताब्यात: हा केवळ ट्रेलर; बिश्नोई गँगशी संबंधित लोणकरची धमकी – Mumbai News

रोहित शेट्टीच्या घरावर गाेळीबार; पुण्यातील पाच आरोपी ताब्यात:  हा केवळ ट्रेलर; बिश्नोई गँगशी संबंधित लोणकरची धमकी – Mumbai News



प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या निवासस्थानावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी काही तासांतच छडा लावला. मुंबई गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पुण्याच्या कर्वेनगर आणि धायरी परिसरातून ५ पैकी ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरने स्वीकारली आहे. रविवारी (१ फेब्रुवारी २०२६) मध्यरात्री १२:४५ च्या सुमारास दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी ‘शेट्टी टॉवर’च्या दिशेने पाच राउंड गोळीबार केला. यातील एक गोळी पहिल्या मजल्यावरील जिमच्या काचेला लागली. घटनेनंतर काही वेळातच शुभम लोणकर याने सोशल मीडियावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत, “हा केवळ ट्रेलर आहे, आमच्या कामात हस्तक्षेप करू नका,” अशी धमकी दिली. पाचही आरोपी केवळ हँडलर्स मुंबई गुन्हे शाखेच्या १२ पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचे पुणे कनेक्शन शोधले. कारवाईत पुण्याच्या कर्वेनगर येथील मावळे आळीत राहणारा अमन आनंद मारोते (२७) आणि गल्ली क्र. २ मधील आदित्य ज्ञानेश्वर गायकवाड (१९) याला, तसेच, धायरी परिसरात आम्रपाली बिल्डिंगमध्ये राहणारा सिद्धार्थ दीपक येनपुरे (२०) आणि रायकर मळा येथील समर्थ शिवशरण पोमाजी (१८) यालाही अटक केली आहे. यासह पुणे शहरातून स्वप्निल बंडू सकट (२३) यालाही ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणांनी गोळीबाराच्या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp