
Auto News : वाहनधारक आणि त्यातही जुन्या वाहनांची मालकी असणाऱ्या सर्वच मंडळींसाठी प्रशासनानं काही महिन्यांपूर्वी एक नवा नियम लागू केला. ज्या नियमाअंतर्गत जुनी वाहनं असणाऱ्या वाहनधारकांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमान्वये ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (High Security Number Plate) लावणं बंधनकारक होतं. यासाठीची काळमर्यादासुद्धा प्रशासनानं निर्धारित केली होती. ज्यानुसार नोव्हेंबर महिना या प्रक्रियेसाठी अखेरचा महिना होता. आता मात्र चौथ्या वेळेस ही अंतिम तारीख आणखी पुढं गेली असून, या प्रक्रियेला चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.
अद्यापही असे कैक वाहनधारक आहेत ज्यांना ही नंबर प्लेट बसवता आलेली नाही. अशा नागरिकांना प्रवासात अडचणी येऊ नयेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सततची मुदतवाढ पाहता राज्यातील असंख्य वाहनधारकांनी अद्यापही ही नव्या तंत्रज्ञानाची HSRP नंबर प्लेट बसवली नसल्याचं स्पष्टच होत आहे. नोंदणीसाठी असणारी गर्दी, अपेक्षित वेळात तारीख न मिळणं, सर्व्हर डाऊन असणं अशा अनेक अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत असल्या कारणानंच ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.
HSRP लावलीच नाही तर?
राज्य परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार ही नंबर प्लेट अतीव महत्त्वाची असून, ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यात येणार नाही, त्यांच्यासाठी RTO कार्यालयाशी संलग्न कामांमध्ये अडथळे येतील. याशिवाय होणारे परिणाम खालीलप्रमाणे….
कर्ज नोंदणी- जुन्हा वाहनांसाठीच्या कर्जाची नोंदणी करठणं किवा काढणं अशी कामं रखडतील.
परवाना नुतनीकरण होणार नाही- खासगी, व्यावसायिक वाहनांचा परवाना नुतनीकरणात अडचणी
पत्ता बदण्यात अडचणी- वाहनांच्या नोंदणीवर असणारा पत्ता बदलता येणार नाही
हस्तांतरण – वाहनांचं मालकी हस्तांतरण अर्थात वाहन दुसऱ्याच्या नावावर करता येणार नाही.
FAQ
HSRP म्हणजे काय आणि कोणांसाठी बंधनकारक आहे?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी वाहन चोरी रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केली आहे. महाराष्ट्रात 2019 एप्रिलपूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनधारकांसाठी ही बंधनकारक आहे.
महाराष्ट्रात HSRP बसवण्याची अंतिम मुदत काय आहे?
महाराष्ट्र सरकारने HSRP बसवण्याची मुदत चौथ्यांदा वाढवली असून, आता अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. यापूर्वीची मुदत 15 ऑगस्ट 2025 होती, पण अनेक वाहनधारकांना अजूनही प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही.
मुदतवाढ का देण्यात आली?
अनेक वाहनधारकांना नोंदणी गर्दी, अपेक्षित वेळेत तारीख न मिळणे, सर्व्हर डाऊन होणे यासारख्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे 1.5 कोटींहून अधिक वाहने अजूनही HSRP विना आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.