
Sambhajinagar Bondu Baba: छत्रपती संभाजीनगरातील वैजापूरच्या शिऊर गावातून एक बुवाबाजीचा प्रकार समोर आला आहे. इथे एक बाबा अघोरी पद्धतीने सामान्यांवर उपचार करत होता. लग्न होत नाही, दारू सोडत नाही, भूतबाधा झाली आहे, अशा नागरिकांना मग ती महिला असो वा पुरुष तो त्याना काठीने मारायचा. महत्त्वाचं म्हणजे लोकही तिथे यायचे मात्र हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघड केला. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर आता या भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला आहे.
व्याधी कुठलीही असो वा कुठलीही अडचण संभाजी नगरच्या शीऊरचा हा संजय पगार नावाचा भोंदू बाबा त्यावर उपचार करतो असा त्याचा दावा होता. यासाठी गुरुवारी आणि रविवारी हा भोंदू बाबा आपला दरबार भरवायचा लोक तिथे यायचे आणि हा बाबा त्यांच्यावर उपचार करायचा. स्वतःचा बूट तोंडात धरायला लावायचा आणि मंदिराला गोल चकरा मारायला लावायचा. एवढेच नव्हे तर लघु शंका करून तो पिण्यासही देत असे असेही पुढं आलं आहे. याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकांकडून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत होता,
हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळाला त्यानंतर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोण आहे हा बाबा
संजय पगार असं या बाबाचं नाव असून त्याचे वय 48 वर्ष आहे. या बाबाचा लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा व्यवसाय होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून बिरोबा मंदिरात स्वतःचा दरबार भरवतो आणि लोकांवर उपचार करून पैसे कमवतो. धक्कादायक म्हणजे या बाबावर स्वतःच्या बायकोचा छळ केल्याचा आरोप आहे आणि त्याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा सुद्धा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या बाबावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता हा बाबा फरार आहे ग्रामीण भागात आजही असे अनेक बाबा बुवा लोकांवर उपचार करण्याच्या नावाखाली लोकांना छळतात लोकांची पैशाने लूट करतात. मात्र सामान्य जनता अजूनही या बाबाबुवांच्या नादी लागते हे दुर्दैव आहे या असल्या बाबांवर विश्वास ठेवण्यापेक्षा यांना धडा शिकवला तरच या बाबाबुवाचे दरबार उठतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.