
अमर काणे, झी २४तास, नागपूर : पालकांनो तुमच्या लहान मुलाची काळजी घ्या. कारण लहान मुलांमध्ये एक विचित्र आजार पसरत आहे. या आजाराचं नाव हँड, फूट, माऊथ डिसिज असं आहे.. 2 ते 6 वर्ष वयोगटातलल्या मुलांमध्ये हा आजार आढळून येत आबे. कांजण्यांसारखा दिसणारा हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे मुलांमध्ये तो वेगानं पसरु लागला आहे.
सध्या राज्यातील काही लहान मुलांमध्ये पसरणा-या HFMD म्हणजेच हँड , फूट, माऊथ डिसीजने पालकांची चिंता वाढवलीये. गेल्या काही दिवसात या आजाराची प्रकरणं वाढताना दिसताय. 1 ते 10 वर्ष वयोगटातील लहान मुलांना सर्वाधिक या आजाराची लागण झालीये. या आजारामध्ये लहान मुलांच्या हातावर, तोंडावर छोटछोटी पुरळ येते. हा आजार कांजण्यांसारखा दिसत असला तरी तो एक संसर्गजन्य आजार आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये HFMD आजार होण्याचं प्रमाण अधिक आहे.
काय आहे HFMD आजार?
– HFMD म्हणजे हँड, फूट , माऊथ डिसीज
– एन्टरोव्हायरस विषाणामुळे आजार होतो
– 1 ते 10 वयोगटातील मुलांना संसर्गाचा अधिक धोका
– आजार असलेल्या मुलांच्या संपर्कात आल्यास लागण
– शिंका, खोकल्यामधून व्हायरस पसरू शकतो
-रुग्णाने वापरलेल्या वस्तू वापरल्यास संसर्गाची शक्यता
-विषाणू शरीरात शिरल्याच्या 5-6 दिवसात लक्षणं दिसतात
-व्हायरसविरोधात कोणतंही विशिष्ट औषध उपलब्ध नाही
-लक्षणांनुसार डॉक्टर उपचार करतात
या आजाराची लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केलंय.
काय आहेत HFMDची लक्षणं?
– ताप
– घशात खवखवणं
– जीभ, हिरड्या, गालाच्या आत लाल फोड
– हातावर, पायावर पुरळ
– खाज
– अंगदुखी
– उलट्या, मळमळ
हा दिर्घकालीन परिणाम करणारा किंवा अतिगंभीर आजार नसला तरी संसर्गजन्य आणि त्रासदायक आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. लहान मुलांना सातत्याने हात स्वच:ता धुण्यास सांगावं, मुल बाधित असल्यास त्याला शाळेला जाणं टाळा…आजाराची लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



