
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. यासाठी सरकार आयकर विभागाची मदत घेणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार
.
राज्यातील महायुती सरकारने आपल्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. या अंतर्गत लाभार्थी महिला या योजनेचे निकष पूर्ण करतात का? याची घरोघरी जाऊन छाननी केली जात आहे. यानंतर निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार हे स्पष्ट आहे.यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत अंदाजे 6 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
…तर मतांसाठी लाच दिली, यावर शिक्कामोर्तब होईल आता जर योजनेतून महिलांची नावे कापणार असतील, तर मत घेऊन हे करत आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की, तुम्ही लाच घेण्याचाच प्रकार करत आहात. जर नावे कापली जाणार असतील, तर त्यावर शिक्कामोर्तब होईल की, मतांसाठी लाच दिली. मते घेतली, सरकार आले, सत्ता आली. आता महिलांना घरी पाठवा. अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार. अन्यथा आम्ही सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू. केबिनमध्ये आम्ही महिलांना बसवू. मंत्र्यांचे जीने मुस्कील करू, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आता पळ कशाला काढत आहात आता पडताळणी करून नावे कमी करत आहात म्हणजे तुम्ही आमच्या महिला भगिनींना खोटी आश्वासने देऊन फसवले. आता पळ कशाला काढत आहात. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामधील सर्वात महत्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. मात्र, अनेक महिलांनी उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत नसताना देखील अर्ज केले होते. निवडणुकीआधी काही गोष्टींची पडताळणी न करताच महिलांना पैसे देण्यात आले. अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ भेटला. परंतु, फेब्रुवारी सुरू होऊन 15 दिवस उजाडले, मात्र, या महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला वर्ग वाट पाहत आहेत. तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील आठ दिवसांत मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते जालना येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मी नुकतीच 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठ दिवसांत मिळेल. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. दिलेला शब्द पाळणारे आहोत. परंतु दिलेल्या योजनेचा फायदा पण तुम्ही नीट केला पाहिजे, असेही ते म्हणाले होते.
लाडक्या बहिणींचा सरकारी तिजोरीवर मोठा भार
दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेवर अमाप खर्च होत असल्यामुळे सरकारच्या विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचा सन 2024-25 चे सुधारित अंदाजपत्रकावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अंदाजपत्रकात सरकारी विभागांनी किती निधी खर्च करावा याचे अनुमान घालून देण्यात आले आहे. एकूण वार्षिक तरतुदीच्या 70 टक्के निधीच खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्यात. या 70 टक्क्यांपैकी निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती व विद्यावेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज व कर्जाची परतफेड, अंतरलेखा हस्तांतरे या विभागांना 100 टक्के निधी खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.