
Ladki Bahin Yojna Loan Scheme: सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. या योजनेंतर्गंत महिलांच्या खात्यात दीड हजार रक्कम जमा होते. आता लाडक्या बहिणी या रकमेचा फायदा व्यावसायासाठी करु शकतात. मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता कर्जदेखील घेता येणार आहे. काय आहे ही योजना जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी 10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे. या कर्जाचे हफ्ते शासनाकडून मिळणाऱ्या दरमहा दीड हजार रुपयांतून वळते करण्यात येणार आहे. ज्या महिलांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे. त्यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.
अनेकांना लाडकी बहीण योजनेंतर्गंत दरमहा 1,500 रुपये मानधन मिळते. त्या महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज त्यांना मिळणार असून 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करु शकतात. महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबवण्यात येणार आहे.
मुंबई बँकेमध्ये 16.07 लाख बचत खात्यांपैकी लाडकी बहीण योजंनेतर्गंत 53 हजार 357 महिलांची शून्य शिल्लक खाती उघडण्यात आली असून त्यांच्या खात्यात दरमहा मानधनाची रक्कम जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे मानधन जमा होत असलेल्या महिलांनी व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाणार आहे.
FAQ
१: लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्ज योजना काय आहे?
उत्तर: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. ही योजना मुंबई बँकेच्या माध्यमातून राबवली जात असून, त्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे.
२: या कर्जासाठी पात्र कोण आहेत?
उत्तर: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. त्या महिलांना दरमहा १,५०० रुपये मानधन मिळत असते आणि त्यांचे मुंबई बँकेत शून्य शिल्लक खाते असणे आवश्यक आहे. ५ ते १० महिला एकत्र येऊनही व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात.
३: कर्जाची रक्कम किती आहे आणि व्याजदर काय?
उत्तर: कर्जाची रक्कम १०,००० ते १,००,००० रुपये असून, व्याजदर शून्य टक्के (०%) आहे. ही योजना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.