
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडून दाखवणारा छावा चित्रपट गत आठवड्यात प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा हाऊसफुल्ल जात आहे. अनेकांना त्याचे तिकिटही भेटत नाही. पण आता अहिल्यानगरचे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी
.
संग्राम जगपात यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे या मोफत शोची घोषणा केली. ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातून महिला-भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी अहिल्यानगर येथील महिलांसाठी बहुचर्चित छावा चित्रपटाचे मोफत शोज आयोजित करण्यात आलेत. हे शो17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे (सायंकाळी 4.30) व सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेजजवळ, जुडीओच्या वर अहिल्यानगर येथे दुपारी 3.30 वा. मोफत पाहता येतील. सर्व महिलांनी संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा.
संग्राम जगताप यांनी यासंबंधी एक मोबाईल क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना त्यांना कोणत्या वेळेत चित्रपट पाहता येईल याची माहिती व तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
3 दिवसांत 121 कोटींचा गल्ला
उल्लेखनीय बाब म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपट गत शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांतच या सिनेमाने 121 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा संभाजी महाराजांची भूमिका साकारत असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्ना यांनी मोगल बादशहा औरंगजेब साकारला आहे. याशिवाय, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनित सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर आदी कलाकारही या चित्रपटात दिसून येत आहेत.
हे ही वाचा…
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चे वादळ:विकीच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्डही मोडला, थिएटर्समध्ये 24 तास शो; संतोष जुवेकरची भावनिक पोस्ट
मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आणि अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ उठवले आहे. 14 फेब्रुवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडत 121 कोटींचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे ‘छावा’ने कमाईच्या बाबतीत विकी कौशलच्या 11 पैकी 10 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता काही थिएटर्सनी तर 24 तास शो लावल्याचे दिसून येत आहे. सगळीकडे ‘छावा’चा बोलबाला सुरू असताना अभिनेता संतोष जुवेकरने सोशल मीडिया भावनिक पोस्ट केली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.