
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या सन्मान निधीची रक्कम 1500 ऐवजी 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महायुती सरकार सत्त
.
भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारताने युद्धविरामाची घोषणा केली. याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे अभिनंदन देखील केले आहे. यासंदर्भातील एक ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. आता त्याच ट्वीटवरून मीम्स शेअर होत आहेत. रोहिणी खडसे यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतल्याचे एक मीम शेअर केले आहे.
रोहिणी खडसेंनी शेअर केलेल्या मीममध्ये काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर याच मुद्यावरून महायुती सरकारला चिमटा काढला आहे. त्यांनी ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तयार करण्यात आलेला एक मीम्स शेअर केला आहे. या मीम्समध्ये अजित पवार यांच्यासोबत रात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, येत्या जूनपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन, जय महाराष्ट्र! अशा आशयाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम्स रोहिणी खडसे यांनी शेअर केला आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतीक्षा
सत्ताधारी महायुतीकडून निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवले जाईल, असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळाले. सरकार स्थापन होऊन बराच काळ उलटून गेला, तरी योजनेची वाढीव रक्कम देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र, सरकारकडून 2100 रुपये कधीपासून देण्यात येतील, याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, या योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढत असल्याचे बोलले जात आहे. तसेच इतर योजनांचा निधी वळवून लाडकी बहिण योजनेवर खर्च केला जातो आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे आता या योजनेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.